- आरोग्य

चेहरा धुवूनही त्वचा तेलकट राहतोय? मग आपल्या तेलकट त्वचेसाठी करा हे घरगुती उपाय

आपल्या चेहऱ्याची त्वचा तेलकट असल्यास त्वचेतून नैसर्गिकपणे तेल येत असल्याने चेहरा ठराविक काळाने काळवंडल्यासारखा दिसतो. तसेच चेहऱ्याची त्वचा तेलकट असल्यास त्यावर हवेत असणारे अत्यंत लहान लहान धूळीचे कण जमा होऊन मुरूम येण्याची शक्यता असते.

म्हणूनच आज आपण इन्फोमराठीच्या या लेखामधून चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी आपण रात्री झोपण्याआधी आपला सगळा मेकअप उतरवल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर थोडासा कापूस घ्या. हाताने त्याची गोळी बनवा. त्यावर गुलाबजलाचे काही थेंब घ्या.

हलक्या हाताने ते आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. रात्रभर राहूद्या सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. अगदी काही दिवसातच आपल्याला फरक जाणवेल.

चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी आपण कोरफड गराचा हि उपयोग करू शकता. कोरफड गराच्या मदतीने आपण चेहऱ्यावरील मुरुम हि घालवू शकता. यासाठी रात्री झोपण्याआधी चेहरा धुतल्यानंतर त्यावर कोरफड गर लावा सकाळी चेहरा धुऊन टाका. असे केल्याने काही दिवसात आपल्या चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होईल.

चेहऱ्यावरील तेलकट त्वचेमुळे बऱ्याचदा चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स हि येऊ शकतात. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा तरी चेहऱ्याला स्टीम द्या. चेहऱ्याला स्टीम दिल्याने आपल्या चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल.

चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी मुलतानी मातीचा लेप आपल्या चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे राहूद्या त्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. असे केल्याने आपल्याला फरक दिसून येईल.

चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी एक चमचा चंदन पावडर आणि एक चमचा हळद पावडर घ्या. त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून आपल्या चेहऱ्यावर लावा. साधारणपणे 10 मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावून ठेवा.

10 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवा. चंदन आणि हळद आणि हळदीची पेस्ट लावल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरील तेलकटपणा नाहीसा होऊन चेहऱ्यावर ग्लो येईल.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. मेडिकली रिव्यू करण्यात आलेला हेल्थलाईन इंग्रजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *