- आरोग्य

पायावरील काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

आपण आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्याची काळजी नेहमी घेत असतो. चेहरा सुंदर दिसावा यासाठी वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर करत असतो. मात्र आपले हात आणि पायांची आपण तितकी काळजी घेत नाही.

सूर्यप्रकाशामुळे बऱ्याचदा आपले पाय काळपट दिसू लागतात. अशा वेळी आपण आपले पाय परत पूर्वी सारखे कसे करायचे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. या उपायांच्या मदतीने आपण घरच्या घरी आपले पाय उजळवू शकता.

पायावरील काळपटपणा दूर करण्यासाठी आपण हा सोपा उपाय करू शकता. यासाठी आपण एका वाटीमध्ये 2 चमचे हळद पावडर घ्या त्यामध्ये 3 चमचे बेसन पीठ मिसळा आणि थोडेसे दही मिसळा.

आता हे मिश्रण हाताने आपल्या पायावर चोळा. 10 मिनिट सुकू द्या त्या नंतर हाताने चोळून धुऊन टाका. हा उपाय केल्याने आपल्याला लगेच फरक दिसेल.

पायावरील काळपटपणा दूर करण्यासाठी संत्र्याची सुकवलेली साल मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता या पावडरमध्ये थोडेसे दूध घाला आणि ही पेस्ट आपल्या पायांवर लावा.

साधारणपणे 15 मिनिटांनी कोरडे झाल्यानंतर हळूहळू पाण्याने आपले पाय धुऊन टाका. असे केल्याने आपल्या पायावरील काळपटपणा दूर होण्यास मदत मिळेल, आणि पाय मऊ होतील.

पायावरील काळपटपणा दूर करण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचासुद्धा वापर करू शकता यासाठी एका वाटीत 2 चमचे बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळा हे मिश्रण आपल्या पायावर लावा. 15 मिनिटांनी पाय धुऊन टाका. काही दिवसात आपले पाय परत पूर्वीसारखे होतील.

कोरफड गराचा वापर करून हि आपण आपल्या पायांचा काळेपणा दूर करू शकता यासाठी एका वाटीत कोरफड गर घ्या हलक्या हाताने ते आपल्या पायावर लावा. 20 मिनिटे राहूद्या नंतर कोमट पाण्याने पाय धुऊन टाका. हा उपाय नियमित केल्याने आपल्याला फरक दिसून येईल.

आपल्याला पायावरील काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *