- इन्फोमराठी

पिवळा झालेला मोबाईलचा कव्हर साफ करण्यासाठी घरगुती उपाय

अनेक कंपन्या मोबाईलच्या सोबत पारदर्शक कव्हर मोफतमध्ये देत असतात यामागे हा उद्देश असतो कि मोबाईल पडल्यानंतर नुकसान होऊ नये. परंतु काही दिवसांच्या वापरानंतर ह्या कव्हरचा रंग बदलून पिवळा दिसू लागतो.

हा कव्हर सिलीकॉनपासून बनवलेला असतो. कोणतेही काम करत असताना मोबाईलच्या कव्हरला हात लागून डाग पडतात. हे डाग घालवण्यासाठी आज आपण काही सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

मोबाईलचा कव्हर साफ करण्यासाठी एका भांड्यात थोडेसे पाणी घ्या. त्यामध्ये मोबाईलचा पिवळा झालेला कव्हर पूर्णपणे भिजेल असा ठेवा आणि वरून त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाका. त्यानंतर स्वच्छ कापडाने हा कव्हर पुसून घ्या. हा उपाय केल्याने पिवळा झालेला मोबाईलचा कव्हर पांढरा शुभ्र होईल.

मोबाईलचा कव्हर साफ करण्यासाठी एका भांड्यात थोडेसे पाणी घ्या त्यामध्ये थोडसा भांडी घासायचा साबण मिसळा त्यामध्ये 15 मिनिट पिवळा झालेला कव्हर ठेवा नंतर हलक्या हाताने चोळून घ्या. साफ झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने कव्हर पुसून घ्या.

मोबाईलचा कव्हर साफ करण्यासाठी हे काही घरगुती उपाय आपण करू शकता. अशीच आपल्या कामाची माहिती आम्ही रोज पोस्ट करत असतो. आपल्याला माहिती आवडल्यास आपण लाईक कमेंट करून सांगत चला. त्याचबरोबर हि माहिती आपल्या मित्र परीवारापर्यंत पोहचण्यासाठी पोस्ट शेअर करा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *