- आरोग्य

कोरड्या खोकल्यावर 10 प्रभावी घरगुती उपाय

हवामानातील बदलामुळे बऱ्याचदा कोरड्या खोकल्याचा त्रास होत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत कोरडा खोकला येत असल्यावर आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो.

कोरडा खोकला येत असल्यास एक ग्लास कोमट पाण्यात चमचाभर मिसळून प्या. मधाचे सेवन केल्याने खोकला कमी व्हायला मदत मिळते. हा उपाय आपण दिवसातून तीन वेळा करायचा आहे.

खोकला येत असल्यावर आपण तुळशीच्या पानाचा काढा प्यायल्याने हि खोकल्या पासून लवकर आराम मिळतो. तुळशीचे पाणी तयार करण्यासाठी तुळशीची 10 पाने घ्या आणि त्यांना बारीक करा.

नंतर एक ग्लास पाण्यात हि पाने घाला. हे पाणी उकळा आणि गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या. हे पाणी थोडे थंड होऊ द्या. नंतर दिवसातून तीन ते चार वेळा हे पाणी प्या. असे केल्याने खोकला कमी होतो.

खोकला येत असल्यावर बऱ्याचदा घशात खवखव होत असते अशा वेळी कोमट पाण्यात दोन चमचे खडे मीठ टाकून त्या पाण्याने गुळण्या करा. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घशातील खवखव कमी होते.

खोकला येत असल्यावर आपण आल्याचा चहा प्या. आल्यामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे आल्याचा चहा प्यायल्याने आपल्या घशातील खवखव कमी होऊन आराम मिळेल. खोकला येत असल्यावर लवंग दालचिनी घालून चहा प्या. आपल्या घशातील खवखव कमी होऊन आराम मिळेल.

खोकला येत असल्यावर रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळदीची पावडर मिसळून प्या. हळदीसोबत दुध प्यायल्याने खोकला कमी होऊन आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळेल. कोरडा खोकला येत असल्यावर शक्य तितका आराम करा.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: मेडिकली रिव्यू करण्यात आलेला हेल्थलाईन इंग्रजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *