- आरोग्य

कपाळावरील पिंपल्स घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

पिंपल्स आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये बाधा असतात. जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्याने,धुळीच्या अलर्जीमुळे, कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट्सचा जास्त वापर केल्याने, वातावरणातील धूळ आणि घाण ही त्वचेवरील छिद्रं बंद करते.

यामुळे  आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात. चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर अशा वेळेस कोणत्याही जाहिरातींना बळी न आपण हे काही घरगुती उपाय करून आपला चेहरा सुंदर बनवू शकता.

आपल्या चेहऱ्याची त्वचा तेलकट असल्यास आपल्या चेहऱ्यावर जादा पिंपल्स येतात. त्यामुळे आपण दिवसातून 2 वेळा तरी आपला चेहरा धुण्याची सवय लावा.

पोट व्यवस्थित साफ होत नसल्यास हि चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात. त्यामुळे पचायला हलका आहार आपण सेवन केला पाहिजे त्याबरोबरच पुरेसे म्हणजेच 2 ते 4 लिटर पाणी प्या. पुरेसे पाणी प्यायल्याने आपली त्वचा टवटवीत राहण्यास मदत मिळते.

चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये यासाठी आपण पिकलेले टॉमॅटो खाल्ले पाहिजे, टॉमॅटो खाल्ल्याने त्वचेला ग्लो येतो. टॉमॅटोमध्ये खूप सारे एंटीऑक्साडेंट असतात.

चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी अस्परिनची गोळी हि उपयोगी असते. अस्परिनच्या गोळीमध्ये असलेल्या अँटीइन्फ्लेटरी घटकांमुळे पिंपल्स घालवण्यासाठीही याची मदत होते.

यासाठी अस्परिनची गोळी कुटून घ्या आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर चेहऱ्यावर ज्या ठिकाणी पिंपल्स आले आहे त्या ठिकाणी ही पेस्ट लावा. सकाळी कोमट पाण्याने आपला चेहरा धुऊन घ्या. आपल्याला फरक दिसेल.

चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी अर्धा कप दुधात थोडी हळद मिसळा आणि पिंपल्स आलेल्या जागेवर लावा. १० मिनिटांनी कोमट पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतील. हा उपाय आठवड्यातून 2 वेळा केल्याने आपल्याला लवकर फरक दिसेल.

चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी एका वाटीमध्ये 3 चमचे पाणी घ्या (संवेदनशील त्वचेसाठी अधिक पाणी वापरा ) त्यामध्ये 1 चमचा अपल सायडर व्हिनेगर मिसळा. कापसावर थोड्या प्रमाणात ते घ्या.

हलक्या हाताने ते आपल्या कपाळावर लावा. “15 ते 20 सेकंदानी” ते सुकल्यावर परत एकदा लावा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका. दिवसातून 2 वेळा असे करा. आपल्या कपाळावरील पिंपल्स कमी होतील.

चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये यासाठी तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळा. असे केल्याने आपल्याला चेहऱ्यावर मुरूम येण्याचे प्रमाण कमी होईल.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. मेडिकली रिव्यू करण्यात आलेला हेल्थलाईन ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *