- आरोग्य

नखांवर पांढरे डाग का येतात? आणि ते घालवण्यासाठी घरगुती उपाय

बऱ्याच वेळा आपल्या नखांवर पांढरे डाग येतात. परंतु आपल्याला असे का होते हे माहीत नसते. बऱ्याचदा हे डाग मॅनिक्योर आणि पेडिक्योरमुळे देखील होतात. नखांवर पांढरे डाग येण्यामागे मुख्य कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता.

आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता झाल्यास हाड ठिसूळ होतात, हात पाय दुखू लागतात तसेच नखांवरही पांढरे डाग येऊ शकतात. नखावरील डाग घालविण्यासाठी काय कराव हे जाणून घ्या.

मुख्य म्हणजे हे डाग घालविण्यासाठी ज्या अन्नपदार्थामध्ये कॅल्शियम आहे अशा अन्नपदार्थांचे सेवन करा. यासाठी खसखस, चीज, दूध, दही, कडधान्ये, डाळी या अन्नपदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा. दुग्धजन्य पदार्थ खाल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. त्यामुळे नखे मजबूत राहतील.

तसेच अंजीर, बदाम, सोयाबीन, गूळ, ताज्या भाज्या यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. हा आहार घेतला तर नखांवर येणारे पांढरे डाग काही दिवसात निघून जातील. आणि परत येणार हि नाहीत.

नखावर दुखापत झाल्यास पांढरे चट्टे येतात. हे चट्टे नख वाढेल तसे पुढे पुढे जातात. हे डाग घालवण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार घ्यावा. डाग निघून जातील.

फंगल इन्फेक्शन झाले तरी नखांवर पांढरे डाग येतात. यासाठी फंगल इन्फेक्शन होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा हे डाग वाढून नखाना दुखापत होऊ शकते.

नखांच्या संबधित कोणताही आजार झाला असेल तर ओळखून जा की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे. त्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता होऊ देऊ नका.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. मेडिकली रिव्यू करण्यात आलेला हेल्थलाईन ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *