- आरोग्य

काजू खाण्याचे फायदे

कोकणात काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे कोकणात गेल्यावर आवर्जून काजूची खरेदी केली पाहिजे काजूमध्ये कॅल्शिअम, झिंक, आर्यन, फॉस्फरस, अँटीऑक्सिडंट घटक असे पोषक घटक असतात. काजूची नुसती चवच चांगली नाही तर काजू हा आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. आज जाणून घेऊयात काजू खाण्याचे फायदे.

आपली पचनशक्ती कमजोर असेल तर आपण काजूचे सेवन केले पाहिजे. काजूमध्ये असलेले मॅग्नेशीअम पचनशक्ती वाढवते. काजू खाल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होतं.

नियमित थोड्या प्रमाणात काजूचे सेवन केल्याने केसांच्या वाढीला चालना मिळते. मायग्रेनचा त्रास होत असल्यावर काजूचे सेवन करू शकता. काजूमधील मॅग्नीझ नावाचे घटक डोकेदुखीसाठी कारणीभूत असलेल्या घटकांना कमी करुन मायग्रेनचा त्रास कमी करण्यास मदत करतो.

नियमित थोड्या प्रमाणात काजूचे सेवन केल्याने मेंदूच कार्य अधिक चांगल होतं. स्मरणशक्ती सुधारते. म्हणूनच लहान मुलांना काजू आवर्जून खायला दिले पाहिजेत.

हाडांच्या सबंधित आजारांना दूर ठेवायचे असल्यास आपण आपल्या आहारात काजूचा समावेश अवश्य करा. शरीरातील थायरॉईडची पातळी सुरळीत करण्यासाठी आपण काजूचे सेवन करू शकता. काजूमध्ये सेलिनिअम नावाचा घटक असतो जो थायरॉईडचे कार्य सुरळीत करण्यासाठी मदत करतो.

आपल्याला रक्ताची कमतरता असेल तर आपण रोज सकाळी 4 ते 5 काजू मधासोबत खाल्ले पाहिजेत. असे केल्याने आपल्याला फरक जाणवेल. काजू पाण्यात भिजवून बारीक करून याचा उपयोग मसाज करण्यासाठी केल्यास त्वचा उजळते.

काजू हे उष्ण असतात. त्यामुळे एकावेळी 5 ते 10 काजू पेक्षा जास्त काजूचे सेवन करू नका. तसेच लहान मुलांना काजू 2 ते 4 काजू देऊ शकता.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *