- आरोग्य

मानेवरील चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. वाढत्या वजन आणि वयानुसार, आपल्या गळ्याभोवती चरबी जमायला सुरु होत असते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती आज आपण घेणार आहोत.

मानेवरील चरबी कमी करण्यासाठी सकाळी एक कप ग्रीन टी प्या. ग्रीन टी पिल्याने तुमचे चयापचय चांगल्या प्रकारे होउन वजन कमी होते आणि मानेवरील चरबी कमी होते.

मानेवरील चरबी कमी करण्यासाठी आहारामध्ये खरबूजाचे सेवन करा खरबूजांमध्ये वजन कमी करणारे घटक असतात. आणि बरीच महत्त्वपूर्ण खनिजे आणि पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ए सारख्या जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे वजन कमी होते आणि मानेवरील चरबी कमी होण्यास मदत मिळते.

मानेवरील चरबी कमी करण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात चमचा भर मध  मिसळून पिल्याने मानेवरील चरबी कमी होण्यास मदत होईल. मानेवरील चरबी कमी करण्यासाठी आहारामध्ये गाजराचा समावेश केल्याने मानेवरील चरबी कमी होण्यास मदत होईल.

कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून दररोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिजम चांगले रहाते आणि सोबतच तुमचे वजन कमी होण्यासही मदत होते. आणि मानेवरील चरबी कमी होण्यास मदत होईल.

रात्री उशिरा जेवन करणे हे चरबी वाढण्याचं मुख्य कारण आहे. रात्री झोपण्याच्या २ तासाआधी जेवा. रात्रीचं जेवन खूपच लाइट असावं. झोपण्याआधी शतपावली कण्यास विसरु नका.

मानेवरील चरबी कमी करण्यासाठी आपण स्माईलिंग फिश हा चेहऱ्याचा व्यायाम करू शकता. यासाठी गाल आत ओढून माश्यासारखे ठेवायचे असतात. साधारणपणे 1 मिनिटापर्यंत असे करा. आणि आपली मान किंचित वर करा. दिवसभरात 4 ते 6 वेळा असे केल्याने फरक जाणवेल.

आपल्याला मानेवरील चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *