- आरोग्य

हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे?

सध्याच्या या धावपळीच्या युगात आपल्याला आरोग्याकडे लक्ष देणं कठीण होत आहे. आपण जो आहार घेतोय तो आपल्या शरीरासाठी योग्य आहे का? हे हि बऱ्याचदा आपल्याला माहित नसते.

चुकीचा आहार, बैठ्या कामाची सवय, पुरेशी झोप न घेणे, मानसीक तणाव, शारीरिक कसरतीचा अभाव यामुळे हृदय विकाराचा धोका वाढत असतो. म्हणूनच आज आपण हृदय विकार टाळण्यासाठी काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

हृदय विकार टाळण्यासाठी नियमित सकस आहार घ्या. ताजी फळे, भाजीपाला, कडधान्ये, सलाड यांचा आहारात समावेश करा. तेलकट, मसालेदार, मैदायुक्त पदार्थ खाणे टाळा.

हृदय विकार टाळण्यासाठी कोणतेही व्यसन करू नका. व्यसन केल्याने हृदय विकाराचा धोका वाढत असतो. हृदय विकार टाळण्यासाठी मानसीक ताण तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

नियमित पुरेशी झोप घ्या. रात्रीचे जागरण करू नका. नियमितपणे पुरेसे पाणी प्या. दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी आपल्या शरीराला व्यवस्थितपणे काम करण्यासाठी गरजेचे असते.

आपले वजन नियंत्रनात ठेवा. रक्तातील कोलेस्ट्रोल वाढू देऊ नका. नियमित व्यायाम करा. अगदीच काही नाही तर सकाळी तीस मिनिटे चालण्याचा व्यायाम आपण करू शकता. जिना चढ उतार करू शकता.

आपल्या जीवनातील ताणतणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी कपालभाती, योगा अशा गोष्टी आपण करू शकता. एका जागेवर 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ बसून राहू नका.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: मेडिकली रिव्यू करण्यात आलेला इंग्रजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *