- आरोग्य

सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. सीताफळाच्या झाडातील औषधी आणि आयुर्वेदीक गुणधर्म देखील मोलाचे आहेत.

पानांचा वापर कडवट औषधे बनविण्यामसाठी केला जातो तर बियांपासून तेलनिर्मिती करता येते व या तेलाचा उपयोग साबण निर्मितीसाठी केला जातो. सीताफळ हे खाण्यासाठी जितके चविष्ट आहे तितकेच त्याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असणाऱ्या सीताफळाचे फायदे जाणून घेऊयात

सीताफळामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असत. सीताफळाचे सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते.

सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात असते याच्या सेवनाने शरीर सुदृढ बनते. सीताफळाचे सेवन केल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात. ज्यांच्या हृदयाचे ठोके जास्त पडत असतील तसेच ज्या व्यक्तींना घाबरल्यासारखे वाटत असेल.

छातीत धडधडणे, दडपण आल्यासारखे वाटणे ही लक्षणे जाणवत असतील तर हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी  नियमित सीताफळाचे सेवन करू शकता. हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ हे अतिशय फायदेशीर आहे.

सीताफळाचे सेवन केल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत मिळते. तसेच पित्ताचा त्रास होत असल्यास सीताफळ खाल्ल्याने त्रास कमी होण्यास मदत मिळते. सीताफळामध्ये लोह आणि क जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते.

वजन वाढत नसेल तर सीताफळ खाल्ल्याने क्षीण झालेल्या मांसपेशीची वृद्धी होते व वजन वाढीस लागते. शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होण्यासाठी आपण सीताफळाचे सेवन करू शकता.

आम्लपित्त, अरुची, शरीरात उष्णता जाणवणे, छातीत व पोटात जळजळ होणे ही लक्षणे जाणवत असल्यास सीताफळ खावे. केस गळती रोखण्यासाठी सीताफळाच्या बिया बकरीच्या दुधामध्ये उगाळून लावल्यास फायदा होतो.

आपल्याला सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. मेडिकली रिव्यू करण्यात आलेला हेअल्थलाईन इंग्रजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *