- आरोग्य

घरातील माश्या घालविण्यासाठी घरगुती उपाय

हवामान बदलल्याने आपल्या सभोवतालचे वातावरणही बदलू लागत. आपल्या घराच्या आजूबाजूला जर उघड्यावर कचरा, पाणी भरलेले खड्डे, उघडी गटारे असतील तर आपल्या घरात माश्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या माश्या घराबाहेर कचऱ्यावर बसतात, मग आपल्या खाण्यापिण्यावर.

मग रोग सुरू होतात. माशा येताना अनेक आजार घेऊन येतात. माशा घरातील खाण्याच्या वस्तूवर बसल्या की जुलाब,टायफाईड, कॉलरा अशा अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत घरातील माश्या घालविण्यासाठी घरगुती उपाय.

घरातील माश्या घालविण्यासाठी घरामध्ये थोडासा कापूर जाळा. आणि खोलीभर फिरवा. असे केल्याने माश्या घरात येणार नाहीत. घरात माश्या येऊ नये यासाठी घराच्या आजूबाजूला तुळशीची झाडे लावा.  तुळशी मध्ये डास आणि कीटक दूर ठेवण्याचा औषधी गुणधर्म असतो.

घरात ज्या ठिकाणी माश्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे. त्या ठिकाणी लाल तिखटाच्या पावडरची फवारणी करा. यासाठी  एका फवारणीच्या बाटलीमध्ये पाणी भरा आणि त्यात थोडीशी लाल तिखटाची पावडर घाला. नीट ढवळून घ्या. हे द्रावण घरात शिंपडा म्हणजे आपल्या घरात माश्या येणार नाहीत. हि फवारणी करताना काळजी घेण आवश्यक आहे.

घरातील माशा घालवण्यासाठी दालचिनीचा वापर करा त्या वासाने त्या पळून जातात. झेंडूच्या वासानेही माशा निघून जातात. घराच्या खिडक्या आणि दारं बंद ठेवा. खिडक्यांना जाळी लावा, मच्छरदाणी लावा.

घरात पंख्याचा वापर करा. शक्य असेल तेव्हा रात्री बाहेरचे लाईट बंद ठेवा कारण माशा प्रकाशाकडे आकर्षित होतात, खाण्याचे पदार्थ हवाबंद कंटेनरमध्ये व्यवस्थित साठवून ठेवा.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: मेडिकली रिव्यू करण्यात आलेला हेल्थलाईन इंग्रजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *