- आरोग्य

रक्तामधील प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या रक्तामध्ये तीन प्रकारच्या पेशी असतात, लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेट. लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन हे द्रव्य असते. शरीरातील ऑक्सिजन वहन करण्याचे कार्य लाल रक्तपेशी करत असतात.

पांढऱ्या रक्त पेशी आपल्याला आजारांपासुन वाचविण्याचे कार्य करतात. प्लेटलेट्स या देखील आपल्या रक्तातील एक महत्त्वाचा घटक असतात.

शरीरातील रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या प्लेटलेट्स करत असतात.

सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडे चार लाख इतकी असते. आपल्या शरीरामध्ये प्लेटलेट्सची संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास जखम झाल्यास रक्तस्त्राव अधिक होऊ शकतो तसेच अचानक नाकातून रक्त येऊ शकत, हिरडयामधून रक्त येऊ शकत.

म्हणूनच प्लेटलेटची संख्या कमी झाल्यास आपण या काही घरगुती उपायांच्या मदतीने ती वाढवू शकता. चला तर जाणून घेऊयात रक्तामधील प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी घरगुती उपाय

प्लेटलेटची संख्या लवकर वाढवण्यासाठी आपण सकाळी रिकाम्या पोटी एक छोटा कपभरून पपईच्या पानाचा रस पिऊ शकता. पपईच्या पानांमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे प्लेटलेटची संख्या वाढण्यास मदत मिळते. याच बरोबर प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी आपण पिकलेल्या पपईचे सेवन हि करू शकता.

प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी दिवसातून दोन वेळा एक ग्लासभर डाळींबाच्या रसाचे सेवन करा. डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात त्यामुळे प्लेटलेटची संख्या वाढण्यास मदत मिळते.

प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी आपण आवळ्याच्या रसाचे सेवन करू शकता. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे प्लेटलेटची संख्या वाढण्यास मदत मिळते. प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी आपण किवी, संत्रे, मोसंबी या फळांचे हि सेवन करू शकता.

प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी गुळवेल कांड्या थोड्याश्या ठेचून रात्रभर पाण्यात भिजायला ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्या. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी शक्य तितक्या हिरव्या पालेभाज्या खा.

आपल्याला रक्तामधील प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: शासकीय एन सी बी आय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *