- आरोग्य

गुडघे दुखीपासून मुक्त होण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

जिना चढून वरती गेल, थोडस चालल, तर गुडघे दुखी लागतात. गुडघेदुखी हि समस्या आपल्याला अगदीच सर्व सामान्य वाटत असते. खरच हि गोष्ट सर्व सामान्य आहे का? तर याचे उत्तर नाही अस आहे.

लवकरच आपण गुडघेदुखीचा इलाज न केल्यास आपल्याला चालणे हि अवघड होऊ शकते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत गुडघे दुखी पासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय.

शरीरात कॅल्शियमची कमी असेल तर, आपले काम जर एकाच जागी बसून असेल, आपले वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर, शारीरिक व्यायामाचा अभाव या आणि अशा अनेक कारणामुळे गुडघे दुखी हि समस्या सुरु होऊ शकते.

मात्र आपल्या जीवनशैली मध्ये तसेच आहारामध्ये काही बदल करून आपण गुडघे दुखी पासून कायमचे मुक्त होऊ शकता. गुडघे दुखीची समस्या सुरु झाल्यास आपण आपल्याच मनाने पेनकिलर गोळ्या घेऊ नका.

गुडघे दुखीची कारणे वेगवेगळी असतात. गोळ्या घेतल्याने आपल्याला तात्पुरता आराम मिळू शकतो. पण परत काही दिवसांनी हा त्रास परत सुरु होऊ शकतो म्हणूनच गुडघे दुखी पासून कायमचे मुक्त होण्यासाठी आपल्याला जीवनशैली मध्ये तसेच आहारामध्ये बदल केला पाहिजे.

गुडघेदुखीचा त्रास कमी होण्यासाठी आपण आल्याचा समावेश आपल्या रोजच्या आहारात करा. आल्यामध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात. आपण आल्याचा चहा घेऊ शकता.

अथवा सकाळी रिकाम्या पोटी कपभर कोमट पाण्यात आल्याचा तुकडा ठेचून गाळून त्या पाण्यात चमचाभर मध मिसळून पिऊ शकता. साधारणपणे तीस दिवस हा उपाय केल्याने आपल्याला आराम मिळू शकतो.

आपले वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढले असेल तर त्यामुळे आपल्या गुडघ्यावर भार येऊन गुडघेदुखी सुरु होते. म्हणून आपण आपले वजन नियंत्रणात ठेवल पाहिजे. (आपल्याला वजन कमी करायचे असल्यास त्या विषयी माहीती हवी असल्यास कमेंट मध्ये सांगा.)

गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारात कॅल्शियमयुक्त गोष्टींचा समावेश केला पाहिजे. म्हणजेच दुध दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा यामध्ये बदाम, काजू, अक्रोड, मनुके अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे.

गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी 2 ते 3 चमचे मेथीचे दाणे रात्रभर भिजवून सकाळी ते खाल्याने गुडघे दुखीपासून आराम मिळतो.

आपण जर उंच टाचा असलेले शूज, चपल्स वापरत असाल तर त्यामुळे हि गुडघे दुखी होऊ शकते. म्हणून शक्यतो उंच टाचा असलेले शूज, चपल्स वापरणे टाळा.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: मेडिकली रिव्यू करण्यात आलेला फार्मइजी ब्लॉग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *