- आरोग्य

भात खाल्याने खरंच वजन वाढते का?

भात हा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे हे सर्वांना माहीतच आहे. भातामध्ये कर्बोदके आणि कॅलरीज याचे भरपूर प्रमाण असते. आत्ताच्या काळात पिकणाऱ्या तांदुळाच्या पिकामध्ये उत्पादन वाढी साठी म्हणून रासायनिक खतांचा वापर केला जातो.

वेगवेगळ्या औषधांची फवारणी केली जाते त्यामुळे पूर्वीच्या तांदळात आणि आताच्या तांदूळ मध्ये फरक ही खूप पडला आहे हे सुध्दा एक सत्य आहे. पण भात खाणे याबद्दल अनेकांच्या मनात तर्क वितर्क आहेत आणि आज आपण हेच जाणून घेणार आहोत कि भात खाल्याने खरंच वजन वाढते का?

आता कोकणातील लोक आपल्या भात खाताना दिसतात पण ते अंगाने जास्त जाडजूड नसतात. तसेच दक्षिण भारतातील लोकांचे हि मुख्य अन्न भात हेच आहे.

खरतर कोकणातील आणि दक्षिण भारतातील लोक जो भात खातात भात खातात तो हातसडीच्या तांदळाचा भात असतो. हातसडीच्या तांदळामध्ये फायबर, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडेंटचे प्रमाण जास्त प्रमाणात असत. हातसडीचा तांदूळ हा पचायला एकदम हलका असतो.

भात जास्त खाल्ल्याने वजन वाढते असा सर्रास समज आहे. त्यामुळे अनेकजण जेवणात खूप कमी भात खातात. भाकरी, चपाती या पदार्थांचे अधिक सेवन करतात. मात्र खरोखरच भात खाल्ल्याने वजन वाढते का?

यास काही शास्त्रीय आधार आहे का? असे प्रश्न पडतात. शरीराला योग्य प्रमाणात न्यूट्रियंट्स मिळावेत यासाठी भात योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. योग्य काळजी घेतल्यास भातामुळे वजन वाढणार नाही उलट कमी होऊ शकते.

आता हेच पहा शिजवलेल्या तांदळाच्या अर्ध्या कपात सुमारे 120 कॅलरी असतात. एक चपाती किंवा ब्रेड स्लाईस मध्ये 80-90 कॅलरी असतात.

तांदूळ डाळ किंवा राजमासोबत खावेत. या पदार्थांमध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असल्याने वारंवार भूक लागत नाही. आणि वजन कमी होते. भात एका वाटीपेक्षा जास्त खाऊ नये. वजन कमी करायचे असेल तर भाताचे पाणी काढून ते खाणे चांगले.

यामुळे भातामधील वजन वाढवणारे न्यूट्रियंट्स निघून जातात. भात खाल्याने आपल्या शरीराची चरबी वाढते तर काहींना हे चुकीचे वाटते शेवटी ते प्रत्येकाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. भात तेल किंवा तूप न टाकता बनविल्यास कॅलरीचे प्रमाण कमी होते.

यामुळे वजन वाढणार नाही. भात आवडत्या भाज्यांसोबत बनवावा. भाज्यांमध्ये जास्त फायबर्स असल्याने दीर्घकाळ पोट भरलेले राहते. वजन सहज कमी होते.

पांढऱ्या तांदळाऐवजी, हातसडीचा तांदूळ, ब्राऊन तांदूळ खा. ब्राऊन राईसमध्ये पांढऱ्या तांदळापेक्षा जास्त फायबर्स, कमी कॅलरी असतात. तांदळासोबत इतर डाळी मिक्स करून खिचडी बनवावी. यामध्ये कॅलरी कमी प्रमाणात असतात.

हातसडीचा तांदूळ हा पचायला एकदम हलका असतो.त्यामुळे ज्या लोकांना पोटाचे आजार आहेत अशा लोकांनी भात खावा जेणेकरून अन्न लवकर पचेल.

तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पाणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा.

वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.

आपल्याला भात खाल्याने खरंच वजन वाढते का? हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *