- आरोग्य

चिकू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी फळ खाल्ली पाहिजेत हे आपल्याला माहित असेलच. चिकू हे फळ जवळपास संपूर्ण भारतात आपल्याला पाहायला मिळत. चवीला गोड असणाऱ्या या फळाची माहिती आज आपण घेणार आहोत.

चीकूमध्ये व्हिटामिन-बी, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि कॅल्शियम, मॅग्नीशियम, पोटेशियम, मॅंगनीज, फायबर, आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात.

चिकूमध्ये सुक्रोज आणि फ्रुक्टोज नावाच्या नैसर्गिक शर्करा असतात, चिकूचे सेवन केल्याने आपल्याला काम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. चिकूमध्ये आढळणारे पोषक घटक शरीरातील दुर्बलता दूर करण्यास उपयुक्त मानले जातात.

चिकूमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह असे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. चिकूचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील हाडे बळकट होण्यास मदत मिळते.

वाढत्या वयाच्या मुलांना चिकू आवर्जून खायला दिला पाहिजे. जेणेकरून त्यांच्या हाडाची वाढ चांगल्या प्रकारे होईल. चिकूमध्ये व्हिटॅमिन-सी हा घटक असतो. चिकूच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत मिळते.

आहारात चिकूचा समावेश केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. पोटात गॅसची समस्या असल्यास आपण चिकूचे सेवन केले पाहिजे. चिकूच्या सेवनाने आपल्याला आराम मिळेल.

चिकूमध्ये फायबर घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे चिकू पचायला अगदी हलके असतो. आजारपणात हि आपण चिकूचे सेवन करू शकता. आहारात चिकूचा समावेश करून वजन कमी करता येते.

चिकूच्या सेवनाने मेंदूचे आरोग्य चांगले राखण्यास मदत मिळते. तसेच मन शांत राहते. अनिद्रेचा त्रास असल्यास नियमित चिकूचे सेवन केले पाहिजे. चिकूमध्ये व्हिटॅमिन ई हा घटक आढळतो. चिकूच्या सेवनाने आपली त्वचा निरोगी आणि सुंदर बनते.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *