- आरोग्य

सकाळी पोट साफ होत नसेल तर करा हे घरगुती उपाय

पोट साफ न होणे ही बऱ्याच जणांची समस्या आहे. अतिप्रमाणात बाहेरील पदार्थांचे सेवन करणे, अशुद्ध पाणी पिणे, वेळेवर झोप न घेणे अशा अनेक कारणांमुळे आपले पोट साफ होत नाही. त्यातच मसाल्याच्या तसेच मैद्याच्या पदार्थांचा अतिवापर यामुळे आपले पोट बऱ्याच वेळा खराब राहते.

पोट साफ झाले नाही तर आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.  पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर तोंडावर पिंपल्स येतात त्याचबरोबर एसीडीटीचा त्रास हि वारंवार होत राहतो.

जर पोटातील न पचलेलं अन्न तसंच आतड्यांमध्ये राहीलं तर ते सडतं आणि त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. म्हणूनच आज आपण पोट साफ होण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती पाहणार आहोत.

पोट साफ होण्यासाठी एक ग्लासभर दूधामध्ये एक चमचा एरंडेल तेल मिसळून रात्री झोपण्याआधी घ्या. हे मिश्रण प्यायल्याने सकाळी पोट व्यवस्थित साफ होईल.

पोट साफ होत नसेल तर सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस, एक चमचा आल्याचा रस आणि दोन चमचे मध घालून रिकाम्यापोटी हे मिश्रण प्यायल्यास पोट साफ होईल.

पोट साफ होण्यासाठी सकाळी मनुके  पाण्यात भिजवायला ठेवा. रात्री झोपण्याआधी हे भिजवलेल्या मनुक्याचं पाणी प्या  आणि ते  मनुके हि खा असे केल्याने पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत मिळेल.

पोट साफ होण्यासाठी गुलकंद खाणे हा एक उत्तम उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे गुलकंद खा. त्यावर एक ग्लास गरम दूध प्यायल्याने पचनशक्ती सुधारते. हा उपाय आठवडाभर केल्यास तुम्हाला पोटाच्या समस्या होणार नाहीत.

पोट साफ होत नसेल तर आपल्या आहारात भाकरीचा समावेश करा. भाकरी खाल्याने अन्न व्यवस्थित पचन होण्यास मदत मिळेल . आणि अन्न पचन व्यवस्थित झाल्याने सकाळी पोट साफ होईल.

मोड आलेले कडधान्य खाणे हे आपल्या पोटाचा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते, कारण मोड आलेल्या कडधान्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते.

तंतुमय फळांचे आणि भाज्यांचे सेवन केल्याने पोट साफ होते. पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी तंतुमय फळांचा आणि भाज्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा.

पोट साफ होण्यासाठी दुपारच्या जेवणानंतर ताक प्या.  दह्यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक घटक असतात.  ज्यामुळे आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत मिळते. आणि आपले पोट व्यवस्थित साफ होते.

पालकची भाजी खाल्ल्याने पोट साफ होते. पालकच्या पानांचा रस या समस्येवर फायदेशीर आहे. रोज अर्धा ग्लास पालकाच्या पानाचा रस पिल्यास पोट साफ होते.

शरीरातील अन्नाचे पचन व्यवस्थित झाल्यास आपले पोट चांगल्याप्रकारे साफ होते. त्यामुळे आहारात अती मसालेदार, तेलकट, मैदायुक्त पदार्थ जितके कमी असतील तितके चांगले राहील.

आहारात पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा. याच बरोबर स्वताला नियमित 3 – 4 लिटर पाणी प्यायची सवय लावा. थोडा का होईना व्यायाम करा. जेणेकरून आपल्याला हा त्रास परत होणार नाही.

आपल्याला पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. कोणतीही कृती करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *