- आरोग्य

झटपट वजन कमी करण्यासाठी सकाळी प्या हे पाणी

बैठे काम केल्याने, तेलकट, मैदायुक्त पदार्थांचे सेवन केल्याने, जास्त मीठ असलेले पदार्थ खाल्याने, सतत कोल्ड ड्रिंकचे सेवन केल्याने आपले वजन वाढले असल्यास आज आपण जाणून घेणार आहोत वजन कमी करण्यासाठीचा जबरदस्त उपाय ज्याच्या मदतीने आपण अगदी काही दिवसातच आपले वजन कमी करू शकाल.

वजन कमी करण्यासाठी आपण रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात 1 चमचा जीरे भिजायला घाला. ते पाणी सकाळी झोपेतून उठल्यावर सेवन करा.

सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने आपले वजन अगदी कमी दिवसातच कमी होईल. जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सीडंट मोठ्या प्रमाणात असतात.

फायबर, पॉटेशिअम, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यासारखे पोषक तत्व असतात. आपल्याला एसिडीटीचा त्रास होत असल्यास सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने तो कमी होण्यास मदत मिळेल.

जिऱ्याच्या पाण्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅंगनीज आणि सेलेनियम सारख्या खनिज द्रव्ये असतात.  जिऱ्याचे पाणी प्यायल्याने हे सर्व पोषक घटक आपल्याला मिळतात.

आणि आपली त्वचा निरोगी चमकदार होते. आपला चेहरा उजळ दिसू लागेल. जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ई असते. सकाळी जिऱ्याचे पाणी प्यायल्या सुरु केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील.

जिऱ्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखता येते. तसेच रक्दाब नियंत्रित करण्यासाठी हि जिऱ्याचे पाणी प्रभावी आहे.

पोटात दुखत असल्यास जिऱ्याचे पाणी प्यायल्याने आराम मिळण्यास मदत मिळते. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने त्यामधील पोषक तत्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळेल.

सकाळी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळेल. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पचन शक्ती चांगली होते.

चांगल्या परिणामासाठी साधारण पणे  जिऱ्याचे पाणी  हे 15 ते 25 दिवसच सेवन करावे. आणि 1 ग्लास पाण्यासोबत 1 चमचा जिरे या प्रमाणातच त्याचे सेवन करावे.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *