- आरोग्य

तळ हातांना आणि तळव्यांना खूप घाम येत असेल तर करा हे घरगुती उपाय

घाम येणे शरीरासाठी खूप चांगले आहे आणि ही एक सामान्य प्रक्रिया देखील आहे. घाम येण्यामुळे शरीरातील अवांछित आणि विषारी घटक सहजपणे दूर होतात.

शरीरावर असे बरेच खास भाग आहेत जिथे हात, पाठ आणि डोके यासारखे घाम जास्त येतो. परंतु आपल्यापैकी फारच थोडे लोक असे हि आहेत, ज्यांच्या पायाच्या तळव्यांना आणि तळ हातांना हि घाम येतो.

आज आपण जाणून घेणार आहोत. तळ हातांना आणि पायाच्या तळव्यांना खूप घाम येत असेल तर आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकतो.

सर्व प्रथम समजून घेऊयात आपल्या तळ हातांना आणि पायाच्या तळव्यांना खूप घाम का येतो. बऱ्याच वेळा प्रत्येक आजाराचे मूळ हे आपला आहार आणि जीवनशैलीवर अवलंबून असते.

जर आपल्या आहारात लसूण, कांदे आणि इतर मसालेदार पदार्थांचा वापर जास्त प्रमाणात असल्यास आपल्या तळ हातांना आणि पायाच्या तळव्यांना खूप घाम येऊ शकतो.

कारण लसूण, कांदे आणि इतर मसालेदार पदार्थ घाम ग्रंथींना उत्तेजन देण्याचे काम करत असतात. या बरोबरच सारखे सारख कॉफी पिणे आणि धूम्रपान केल्याने देखील आपल्या तळहातावरील घाम ग्रंथी उत्तेजित होतात.

जर आपल्याला पीसीओएस, थायरॉईड डिसऑर्डर किंवा इतर कोणत्याही हार्मोनल समस्या असतील तर ते खूप घाम येण्याचे कारण असू शकते.

आपल्या आहारात मसाले कमी प्रमाणात वापरा कारण मसालेदार पदार्थ चवदार असले तरी घामाच्या ग्रंथीना उत्तेजन देण्याचे कार्य करतात.

जर आपण दिवसभर ऑफिसमध्ये किंवा बाहेर सॉक्स आणि शूज घालत असाल तर आपले पाय घरी पूर्णपणे उघडे ठेवा. तसेच, शक्य असल्यास पायातून दोन्ही शूज आणि मोजे काढा. यामुळे घाम कमी होईल आणि पायात बॅक्टेरिया होणार नाही.

बेकिंग सोडा घाम कमी करण्याचा सोपा मार्ग आहे. यासाठी, बेकिंग सोडयाची थोडेसे पाणी घालून पेस्ट बनवा आणि आपल्या हाताला लावा. पाच मिनिटे आपल्या हातावर पेस्ट घासून घ्या आणि नंतर आपले हात धुवा. याचा नियमित वापर केल्यास हातांना घाम येणे कमी होईल.

तळ हातांना आणि पायाच्या तळव्यांना खूप घाम येत असल्यास एक कच्चा बटाटा कापून घ्या अन आपल्या  तळ हातांवर आणि पायाच्या तळव्यांवर पाच मिनिटे घासा असे केल्याने अनावश्यक घाम येणे कमी होईल. जास्त घाम येणे टाळण्यासाठी टोमॅटो खूप फायदेशीर आहे. नियमित टोमॅटोचा रस प्यायल्याने अनावश्यक घाम येणे कमी होईल.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *