लहान आतडे संपून मोठे आतडे सुरू होते तिथे शेपटीसारखा बाहेर आलेला आतड्याचाच एक भाग मोठ्या आतडीच्या सुरवातीला असतो. त्यालाच अपेंडिक्सी म्हणतात. आपल्या शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर अपेंडिक्सेची वाढ होत नाही.
अपेंडिक्स ला सूज येणे यालाच अपेंडिसायटीस असे म्हणतात. या आजारामध्ये अचानक पोट दुखायला लागत, उलट्या सुरु होतात, पाठीत दुखू लागत, चक्कर येते, शौचाला साफ होत नाही, थंडी वाजते, ताप हि येऊ शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत. अपेंडिक्स हा आजार होऊ नये या साठी आपण काय काळजी घेऊ शकतो.
अपेंडिक्स हा आजार होऊ नये यासाठी आपण नियमित भरपूर पाणी प्या. आपल्या आहारात तंतुमय पदार्थाचा समावेश असुद्या. तंतुमय पदार्थाचे सेवन कमी केल्याने पचनप्रक्रियेमध्ये अन्न पुढे जाण्याचा कालावधी वाढतो.
त्यामुळे अन्न एका जागी जास्त वेळ राहते म्हणूनच आपल्या आहारात गाजर, मुळा, बीट, शेवगा, तृणधान्य, चणे, राजमा, हिरवे मटार, अंबाडी, अंजिर, पालक, पेर, खोबरे ,पालेभाज्या, सलाड, कोशिंबीर अशा गोष्टींचा समावेश असुद्या. तसेच एक तरी फळ रोज आपल्या खाण्यात असुद्या. जेणेकरून आपल्याला पुरेसे तंतुमय घटक मिळतील.
आपल्या आहारात भात असेल तर शक्यतो तांदूळ हा हातसडीचा तांदूळ वापरा. हातसडीच्या तांदूळामध्ये पुरेसे तंतुमय घटक असतात. अपेंडिक्स हा आजार होऊ नये यासाठी मैद्यापासून बनवलेले फास्टफूड, पिझ्झा, बर्गर, पाव अशा गोष्टी कमी प्रमाणात असुद्या.
अपेंडिक्स हा आजार होऊ नये यासाठी सकाळी रिकाम्यापोटी तुळशीची काही पाने चावून खावी. तुळशीच्या पानामुळे पोटाचे विकार दूर होतात. अपेंडिक्समूळे होणारी वेदना आणि सूज कमी होण्यासाठी दिवसातून कमीत कमी दोन वेळा आल्याचा चहा प्यावा.
आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.
आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे