- आरोग्य

मेथीच्या भाजीचे आरोग्यवर्धक फायदे

हिरव्या पाले भाज्यांमधे सर्व महत्वाचे पोषक घटक असतात. शरिराची वाढ तसेच चांगल्या आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्या महत्वाच्या असतात. मेथीची भाजी आणि भाकरी हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांचा आवडता आहार आहे. मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील असतात.

ज्याचा आरोग्यासाठी खुप चांगला फायदा होतो. मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे, तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी असते. मेथीच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने, व्हिटॅमिन के असे पोषक घटक असतात. चला तर जाणून घेऊयात मेथीच्या भाजीचे फायदे

मधुमेहाचा त्रास असल्यास आपण आपल्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश केला पाहिजे. कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक विद्रव्य फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते. याच बरोबर मेथीच्या बियां भिजवून त्याचे सेवन केल्याने सुद्धा रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते.

आहारात मेथीच्या भाजीचा समावेश केल्याने केसांच्या समस्या कमी होतात. मेथीचा आहारात समावेश केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात. मेथीच्या पानांची बारीक पेस्ट करून आंघोळीच्या अर्धा तास आधी केसाना लावल्याने केसांमधील कोंडा कमी होतो.

मेथीच्या पानांची बारीक पेस्ट बनवून त्वचेवर लावल्यास त्वचा स्वच्छ व मऊ दिसते. मेथीच्या पानात चिकट पोषक घटक असतात, ज्यामुळे त्वचेला कोरडेपणापासून संरक्षण होते. थंडीच्या दिवसात हा उपाय आपण करू शकता. मेथीच्या पानांची बारीक पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग दूर होतात.

सकाळी झोपेतून उठल्यावर बऱ्याचदा चेहऱ्यावर सूज येते अशा वेळी मेथीच्या पानांची बारीक पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा. 15 मिनिट राहूद्या नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका. आपल्या चेहऱ्यावरील सूज कमी होईल.

छातीत जळजळ होत असल्यास रोजच्या आहारात एक चमचा मेथी दाण्याचा समावेश करा.यासाठी मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजत ठेवा व नंतर स्वयंपाकामध्ये वापरा. सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्याने पोट साफ राहते.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *