- आरोग्य

व्हिटॅमीन बी 12 च्या कमतरतेमुळे काय होते?

आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी, विविध जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, कार्बोहायड्रेट आणि फायबर यांची आवश्यकता असते. आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन बी 12 खुप महत्वाचे असते. व्हिटॅमीन बी 12 च्या कमतरतेमुळे मेंदू आणि मज्जासंस्थेचं कार्य बिघडतं. त्यामुळे विस्मरण, निद्रानाश, नैराश्य यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. चाळिशीनंतर शरीरात व्हिटॅमीन बी 12 चं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागत. आज आपण समजुन घेउयात शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे काय होते.

आपलं शरीर हे आपल्याला प्रत्येक गोष्टीचे सिग्नल्स देत असतं ते आपण ओळखायला शिकलं पाहिजे. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे सतत तोंड येत. तोंडाला आतून फोड येतात. स्मरणशक्ती कमजोर होते. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहत नाही. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे भूक लागत नाही. खाण्यावरची इच्छा उडून जाते.

सुस्तावल्या सारखे वाटत राहते. चिडचिडेपणा वाढतो.छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा चिडचिड होत राहते. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे श्वास घ्यायला हि त्रास होऊ शकतो. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे दूरच्या गोष्टी व्यवस्थित दिसत नाही. तसेच कधी कधी जवळच्या गोष्टी हि दिसत नाही. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे स्पर्शज्ञान कमी होत. थंड, गरम अशा संवेदना होत नाही. हाता, पायाला मुंग्या येतात. म्हणजेच बधीर झाल्यासारखे वाटते.

सतत थकवा आल्यासारखे वाटणे, दृष्टी कमजोर होणं, थोड काम केल तरी चक्कर आल्यासारखे वाटणे. कमजोरी वाटत राहते. ही सर्व शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे आहेत. आपल्याला यापैकी एकापेक्षा जास्त समस्या असल्यास, याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची  खुप कमी आहे.

आमच्या पुढील लेखात आम्ही शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो या विषयी माहिती देऊ. आपल्याला व्हिटॅमीन बी 12 च्या कमतरतेमुळे काय होते ? हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: मेडिकल रिव्यू करण्यात आलेला हेल्थलाईन ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *