- आरोग्य

मोड आलेले हरभरे खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

हरभरा हा भारतातील प्रमुख धान्य आहे. हरभरे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर  असतात.  मोड आलेल्या हरभऱ्यांमध्ये क्लोरोफिल, व्हिटामिन ए, व्हिटामिन बी, व्हिटामिन सी, व्हिटामिन डी आणि याबरोबरच पोटॅशिअम, फॉस्फोरस, लोह यांचे प्रमाण अधिक असते. चला तर जाणुन घेउयात मोड आलेले हरभरे खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे.

भिजवलेल्या हरभऱ्यांपासून शरीराला सर्वाधिक पोषण मिळते. भिजवलेल्या हरभऱ्यांमध्ये क्लोरोफिल आणि फॉस्फरस सारखे खनिजे आढळतात जे आजारांना शरीरापासून दूर ठेवतात. आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, दररोज मुठभर भिजवलेले हरभरा खा.

गरोदर स्त्रियांनी मोड आलेल्या हरभऱ्यांचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे  मोड आलेल्या हरभऱ्यांमध्ये भरपूर प्रोटीन असते. जे गर्भाच्या विकासाला मदत करते.

मोड आलेल्या हरभऱ्यांमध्ये कॅल्शियम असते. ज्यामुळे आपली हाडे आणि दात मजबूत राहतात. याव्यतिरिक्त, आपल्याला मोड आलेल्या हरभरापासून मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम मिळते.

मोड आलेले हरभरे नियमित खाल्याने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहे. मोड आलेल्या हरभऱ्यांमध्ये व्हिटॅमिन एची चांगली मात्रा असते. मोड आलेले हरभरे खाल्याने आपली दृष्टी चांगली राहण्यास मदत मिळते.

मोड आलेले हरभरे नियमित खाल्याने त्यामधील पोषक तत्वांमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढायला मदत मिळते. मोड आलेल्या हरभऱ्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे आपली पचनसंस्था चांगली राहण्यास मदत मिळते.

मोड आलेले हरभरे नियमित खाल्याने रक्तातील साखर नियंत्रीत राहते. मोड आलेले हरभरे खाताना या गोष्टी लक्षात ठेवा. मोड आलेले हरभरे हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. मात्र जास्त प्रमाणात ते खाऊ नका. एक लहानशी वाटी भर हरभरे एका वेळी साठी पुरेसे असतात. त्याचबरोबर हरभरे व्यवस्थित चावून खा.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *