दूध हे आरोग्यासाठी चांगल असल्याने आपण त्याचं सेवन करतो. आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे.
दुधात जीवनसत्व, मिनरल्स असल्याने दूध पोषक असतं. परंतु, आयुर्वेदानुसार काही पदार्थांबरोबर दुधाचं सेवन करु नये. त्यानं शरीराला नुकसान पोहोचतं. असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते चला जाणुन घेउयात
लिंबू किंवा आंबट पदार्थ खात असाल तर एक तासांपर्यंत दूध घेणे टाळा. हे एकत्र खाल्ल्याने ऍसिडिटी, गॅसची समस्या होऊ शकते. मासे खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये. असे केल्याने पाचन समस्या उद्भवू शकतात. एवढेच नव्हे तर मासे खाल्ल्यानंतर दूध पिल्याने पोटदुखी होऊ शकते.
कधीही दुध प्यायल्या नंतर कारले, भेंडी अशा भाज्या खाऊ नका. दुध प्यायल्यानंतर लगेच आपण अशा भाज्या खाल्यास त्वचा रोग होऊ शकतात.
दूध कधीही आंबट आणि खारट पदार्थांबरोवर पिऊ नये. तसेच जेवणात जर मुळा खाल्ला असेल तर लगेच दूध पिऊ नये. त्यामुळे त्वचेचे रोग होण्याची शक्यता आहे. मुळा खाल्ल्यानंतर कमीतकमी दोन तासानंतरच दूध प्या.
मसाल्याचे पदार्थ खात असाल तर यासोबत दूध किंवा दूधापासून तयार केले पदार्थ खाणे टाळावे. हे खाल्ल्याने पोटदुखी, एसिडिटी, गॅसची समस्या होऊ शकते. दुध प्यायल्या नंतर फणसाचे सेवन करू नका.
लिंबूवर्गीय फळे खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन करणे टाळावे. असे केल्याने त्या व्यक्तीला उलट्यांचा त्रास होऊ शकतो. लक्षात ठेवा की अशी फळे खाल्ल्यानंतर, सुमारे 2 तासांनीच दूध प्या.
उडीद डाळ आणि दूध दोन्ही एकत्र घेतल्याने आपल्या पाचक प्रणालीवर वाईट परिणाम होतो. असे केल्याने आपल्याला पोटदुखी, उलट्या आणि आपल्या शरीरात भारीपणा जाणवू शकतो.
आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.