एका ठराविक वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. सुरकुत्यामुळे चेहऱ्याची सुंदरता बिघडते. तसेच आत्मविश्वासही कमी होतो. आज आपण चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी घरगुती उपायांची माहिती या लेखामधुन घेउयात.
लिंबू आणि संत्री सारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई भरपूर असतात, म्हणून ते त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात . लिंबूवर्गीय फळ त्वचा तरुण आणि सुंदर बनविण्यात मदत करतात. लिंबूवर्गीय फळांमध्ये आढळणारे फ्लाव्होनॉइड त्वचेमध्ये कोलेजेन आणि इलेस्टिन राखून ठेवण्यास मदत करतात. म्हणून आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चेहऱ्यावर चंदन लेप लावा. चंदन लेप लावल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होण्यास मदत मिळेल. यातील अँटीबॅक्टरील तत्त्व चेहऱ्यावर परिणाम करणाऱ्या बॅक्टेरीया नष्ट करून चेहरा उजळ बनवतात.
चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी एक ताजा टोमॅटो घ्या अन मिक्सर मध्ये बारीक करून घ्या त्यामध्ये काही थेंब गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावरील त्वचेवर कापसाने लावा. ५ ते १० मिनिटं तसाच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. या उपायाने आपल्या चेहऱ्याची त्वचा तजेलदार होईल.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी पपईचा गर आणि केळं मिक्सरमध्ये वाटून घ्या.वाटलेले मिश्रण तुमच्या सुरकुतलेल्या त्वचेवर लावा. १० मिनीटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. पपईमध्ये चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करणारे गुणधर्म असतात.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी लिंबू पाण्याने चेहरा धुवून घ्या. लिंबू पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील मृत पेशी तसेच सर्व प्रकारचे डाग नाहीसे होऊन चेहरा नितळ होण्यास मदत मिळते. यातील अॅसिडने चेहऱ्यावरील ऑईल बॅलेन्स करते.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी ५ बदाम रात्रभर दूधात भिजत ठेवा.सकाळी साले काढून दुधासोबत बदाम मिक्सरमध्ये वाटून घ्या.चेहऱ्यावर हे मिश्रण लावा. २० मिनीट चेहरा तसाच राहुद्या नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून काढा.बदामामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. आणि तुमची त्वचा पुन्हा सतेज व उजळ दिसू लागेल.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचा निरोगी, मऊ आणि तरुण राहण्यासाठी आपण चांगल्या गोष्टी खा. आणि शक्य तितके पाणी प्यावे. याशिवाय पुरेशी झोप घ्या आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.