- आरोग्य

पचनक्रिया सुधारण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या शरीरासाठी महत्वाची अशी कोणती क्रिया असेल तर ती “पचनक्रिया”. शरीराला हवी असलेली पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात पोहचवण्याचे काम हे पचनक्रियेद्वारे केले जाते आणि आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते.

चांगली पचन संस्था असेल तर खाल्लेल्या अन्नाचे पचन केले जाऊन शरीराच्या प्रत्येक भागात ऊर्जा पोहचवली जाते. त्यामुळे आपली पचनक्रिया सक्षम असणे खूप गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात पचनक्रिया सुधारण्यासाठी काय उपाय करायला हवेत.

१) ज्या अन्नपदार्थातून शरीराला पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात उदा. फळे आणि भाज्या यांचे सेवन आपण केले पाहिजेत. पचन क्रिया सुधारण्यासाठी हे फायदेशीर ठरते. अनारोग्यकारक आणि विशेषतः तेलकट पदार्थांचे सेवन करणे शक्यतो टाळा.

२) पचनतंत्रातील बॅक्टेरिया संतुलित राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे खूप आवश्यक आहे. आहारातून मिळणारी पोषण तत्वे पोहचवण्यासाठी देखील याची मदत होते. पचन व्यवस्थित होण्यासाठी दिवसभरात कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी प्यायला पाहिजे.

३) केळीचे नियमित सेवन केले तर त्यामधील असलेल्या फायबर घटकांमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे जर आतड्यांमध्ये ज्वलन होत असेल तर ती जळजळ देखील काही प्रमाणात कमी होते.

४) जेवणाची वेळ ठरवा आणि ठरवलेल्या वेळेचे जमेल तेवढे पालन देखील करा. रोज ठरवलेल्या वेळेवर जेवण करणे पचनक्रियेस फायदेशीर ठरते. एकाग्र होऊन जेवण करावे. दूरध्वनी आणि इतर लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींचा वापर जेवण करताना शक्यतो टाळावाच. जेवण करताना बऱ्याचवेळा टीव्ही बघत जेवण केल जात त्यामुळे आपण जास्त प्रमाणात जेवण करतो. म्हणूनच जेवण करताना टीव्ही बघणे टाळा.

५) रोजच्या वापरात सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध असलेली हळद कोमट पाण्यामध्ये मिसळून प्या. यामुळे गॅस चा त्रास कमी होतो आणि आपल्या आरोग्यसाठी सुद्धा एक उत्तम असा उपाय आहे.

६) शुद्ध आणि ताजी हवा आपल्या शरीराला मिळणे खूप गरजेचे असते. सकाळी मॉर्निंग वॉक, योगासने किंवा व्यायाम करण्याची सवय शरीराला लावा. योगासन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास फार मदत होते.

७) पुदिना, पपई आणि अननस यांचे सेवन पचन क्रिया सुधारण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी मदत करते. एक वाटी दह्याचे सेवन केल्याने त्यातील असलेलं गुणधर्म पचनक्रिये संबंधित असलेल्या समस्या दूर ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतात.

८) पचनक्रिया मजबूत करण्यासाठी सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या. हा देखील उत्तम असा लाभदायक उपाय आहे.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *