- आरोग्य

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

शरीराचा समतोल साधण्यासाठी प्रतिकारशक्ती गरजेची असते. आधुनिक काळात नवीन नवीन येणाऱ्या आजारांचा प्रतिकार करण्यासाठी औषधं, उपचारा बरोबरच रोग प्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे असते. संक्रमण आणि रोगांविरूद्ध लढा देण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती खूप महत्वाची असते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात थोडेसे बदल करणं आवश्यक असतं. यासाठी खाली दिलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

मशरूमच्या सेवनाने शरीराला रिबोफॅव्हिन व्हिटॅमिन बी मधील घटक मिळतात. व्हिटॅमीन बीमुळे अनेक आजारांपासून दूर राहता येतं.  व्हिटॅमिन बी मध्ये असणारे रिबोफॅव्हिन या घटकामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत मिळते.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कच्चा लसून खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. लसणामध्ये मोठ्या  प्रमाणात झिंक, सल्फर, आणि व्हिटॅमिन ए आणि ई सुद्धा असतात.

कलिंगडाच्या सेवनाने केवळ शरीर थंड राहण्यास मदत होत नाही तर रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी शरीराला अँटिऑक्सिडंटची आवश्यकता असते. कलिंगडामध्ये ग्लुटॅथिओन हा अँटिऑक्सिडंटमधील घटक असतो. या घटकामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नियमित दह्याचं सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती चांगली राहण्यास मदत मिळते. दह्याचा आहारात समावेश केल्याने पचनक्रियाही सुरळीत राहण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन्समुळे रोगप्रतिकार शक्तीे वाढते. म्हणूनच आहारात मोसंबी, संत्रे किंवा लिंबाचा समावेश असावा.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात पालक या भाजीचा समावेश करा. पालकमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट, आणि व्हिटॅमिन सी सारखे महत्त्वाचे घटक असतात. हे घटक रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. पालकमध्ये असणाऱ्या फॉलेक या घटकामुळे शरीरात नवीन पेशी तयार होण्यास मदत होते.

जंक फूड, तेलकट मसालेदार अन्न खाणे टाळा. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर जर तो पचला नाही तर शरीरात आम्ल वाढते आणि त्यामुळे रोगप्रतिकारकशक्तीम कमी होते.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी केवळ योग्य आहार घेऊन भागणार नाही, तर त्यासाठी नियमित व्यायामाचीही गरज आहे. व्यायाम केल्याने रक्तप्रवाह सुधारतो. तसेच व्यायाम केल्याने चांगली झोप ही येते.

शरीराला कमीत कमी 7 – 8 तास झोप आवश्यक असते. पुरेशी झोप घेतल्याने शरीराची झालेली झीज भरून निघते. तसेच अन्न पाचन क्रिया व्यवस्थित होते. मानसिक, शारीरिक तणावामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते त्यामुळे तणाव घेऊ नका. मनावर ताण असेल तर रोगप्रतिकारक शक्ती्ही कमी होते.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *