चांगले कोलेस्टेरोल शरीरासाठी आवश्यक असते मात्र आपल्या रक्तामध्ये कोलेस्टेरॉल जर ठराविक पातळीपेक्षा जास्त झाले तर हृदयविकार, पॅरालीसीस यांसारख्या विकारांची शक्यता वाढते.
आपण जर अधिक तेलयुक्त आहार घेत असाल तसेच धु’म्र पान करत असाल तर यामुळे कोलेस्टेरॉल प्रमाणापेक्षा जास्त वाढण्याचा धोका असतो. आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य आहे की नाही हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत शरीरातील कोलेस्टेरॉल पातळी वाढल्याची लक्षणे कोणकोणती असतात.
शरीरातील कोलेस्टेरॉल पातळी जास्त झाली असल्यास थोडेसे परिश्रम केले तरी धाप लागते. दम भरून येतो. जास्त वेळ उभे राहू वाटत नाही. पाय दुखू लागतात. तसेच चालताना, पळताना हि लगेच पाय दुखू लागतात. शरीरातील कोलेस्टेरॉल पातळी जास्त झाली असल्यास थोडेसे काम केले तरी लगेच प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो. अगदी थोडी हालचाल जरी केली तरी खूप घाम येतो.
शरीरातील कोलेस्टेरॉल पातळी जास्त झाली असल्यास अचानक वजन वाढू लागते. रक्तदाब वाढतो. या पैकी जर आपल्याला एका पेक्षा जास्त लक्षणे जाणवत असल्यास आपण डॉक्टरांची भेट घेऊन आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य आहे की नाही हे तपासून घेतल पाहिजे.
आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.