- आरोग्य

घरातून मुंग्यांना पळवून लावण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे उपाय

स्वयंपाकघरात एखादी गोष्ट सांडली किंवा साखरेच्या डब्याचे झाकण लावायचे राहिल्यास त्याच्यावर अगदी काही वेळातच मुंग्या झाल्याचे आपण बघतो. घरात मुंग्या होऊ नये यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या खडूचा वापर करतो अथवा कीटक नाशकाचा वापर करतो.

परंतु मुंग्या पळवण्यासाठी घरामध्ये कीटक नाशकांचा वापर करणे आपल्या घरातील लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतं. या मुंग्या लहान मुलांना चावल्यास त्या ठिकाणी प्रंचड वेदना होतात.

तसेच सूज हि येऊ शकते म्हणूनच आज आपण कीटक नाशकांचा वापर न करता काही घरगुती उपायांच्या मदतीने मुंग्यांना घराबाहेर पळवून लावण्याचे घरच्या घरी करता येतील असे उपाय बघणार आहोत.

घरात मुंग्या येऊ द्यायच्या नसल्यास आपल्या स्वयंपाकघराची फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाका. मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्याने घरात मुंग्या येणार नाही.

घरात ज्या ठिकाणी मुंग्या येतात अश्या ठिकाणी लवंग पावडर टाकल्यास मुंग्या येणार नाहीत. साखरेचा डबा बाहरेच्या बाजूने लवंग तेलाने पुसून मग त्यामध्ये साखर भरा असे केल्याने साखरेच्या डब्याला मुंग्या लागणार नाही.

घरामध्ये मुंग्या दिसू लागल्या कि त्यावर कडूलिंबाच्या पानाचा रस फवारल्याने हि मुंग्या घराबाहेर जातात. यासाठी मुठभर कडूलिंबाची पाने मिक्सर मध्ये बारीक करून घ्या गाळणीच्या साहाय्याने रस गाळून घ्या.

त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळा आणि छोट्या स्प्रे च्या साहाय्याने हा रस मुंग्या असलेल्या ठिकाणी फवारा. अगदी काही वेळातच मुंग्या दिसेनाश्या होतील. घरात मुंग्या ज्या ठिकाणी येत असतील  अशा ठिकाणी तमालपत्र ठेवा. तमालपत्राच्या वासाने मुंग्या घरातून पळून जातात.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *