- आरोग्य

शरीरावरील चरबीच्या गाठी घालवण्यासाठी घरगुती उपाय

वाढत्या वयानुसार आपल्या शरीरामध्ये एस्ट्रोजन हार्मोन्सची मात्रा घटू लागते. ज्यामुळे आपल्या शरीरात रक्त परीसंचन व्यवस्थित होत नाही. याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ लागतो. यामुळे आपल्या शरीरात चरबीच्या गाठी तयार होऊ लागतात.

आपल्या शरीरावर चरबीच्या गाठी होण्यासाठी बऱ्याचश्या गोष्टी कारणीभूत असू शकतात. आपल्या आहारात तेलकट मसालेदार पदार्थ असल्यास, बैठे काम असल्यास, वजन वाढल्यास शरीरावर चरबीच्या गाठी येऊ शकतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. शरीरावरील चरबीच्या गाठी घालवण्यासाठी घरगुती उपाय.

शरीरावरील चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी आपण नियमितपणे सकाळी ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्या. लिंबाच्या रसामध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे शरीरातील फॅटी टिश्यू कमी होण्यास मदत मिळते. शरीरावरील चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी त्यावर एरंडेल तेलाने गाठी असलेल्या ठिकाणी मालिश करा. असे केल्याने चरबीच्या गाठी कमी होतील.

शरीरावरील चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी तसेच शरीरातील रक्तामध्ये असणाऱ्या अशुद्धी दूर करण्यासाठी एक चमचा आवळा पावडर आणि अर्धा चमचा हळद पावडर एक कप पाण्यात मिसळून प्या. असे केल्याने रक्तातील अशुद्धी दूर होण्यास मदत मिळेल. तसेच शरीरावरील चरबीच्या गाठी कमी होण्यास मदत मिळेल.

आपल्या शरीरावरील चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी आपण सकाळी ग्लास पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर टाकून प्या. अॅपल सायडर व्हिनेगर असणाऱ्या घटकामुळे शरीरातील फॅटी टिश्यू कमी होतील. शरीरावरील चरबीच्या गाठी येऊ नये यासाठी आपण सकाळी लसणाची एक पाकळी खाऊ शकता.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *