- आरोग्य

पोटदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

उघड्यावरील अन्न खाल्ल्याने,दुषित पाणी प्यायल्याने, अपचन,गॅस होणे, पोटात कळ येणे, अशा पोटाच्या समस्या सुरु होतात. वारंवार होणारी पोटदुखी रोखण्यासाठी गोळ्या खाणे योग्य नाही. यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. आज आपण पोटदुखी कमी करण्यासाठी काही उपाय पाहणार आहोत.

पोटदुखी कमी करण्यासाठी लिंबू हा सर्वांच्या घरी सहज उपलब्ध असतो. लिंबू हा पोटदुखीसाठी सर्वात चांगला उपाय आहे. जर पोट दुखत असेल तर आल्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास पोटदुखी थांबते. हा एक सोप्पा घरगुती उपाय आहे.

कोरा चहा प्यायल्यानेदेखील पोट दुखणे थांबते. त्यात थोडा लिंबाचा रस टाकल्यास लवकर परिणाम होतो. वारंवार होणारी पोटदुखी थांबविण्यासाठी ओवा खाणे हा एक चांगला उपाय आहे. पोटदुखी रोखण्यासाठी ओवा चघळून खावा. त्यामुळे पोटदुखी कमी होते.

पोटदुखी कमी करण्यासाठी खाण्याचा सोडा लिंबू पाण्यात मिसळून पिल्यास गॅस होऊन पोट दुखत असेल तर कमी होईल. हा एक उत्तम उपाय आहे. मळमळ होत असल्यास एक ग्लास ताकात चिमुटभर सैंधव मीठ घालून प्यायल्याने आराम मिळतो.

आल्याचा रस हा पोटदुखी कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे. आल्याचा तुकडा तोंडात ठेऊन चघळल्यास हि पोटदुखी कमी होईल. जिरे खाल्याने पोटदुखी कमी होते. जिऱ्याचे पाणी पिल्यास पोटदुःखी कमी होईल. हा एक रामबाण उपाय आहे. ज्यावेळी पोटदुखी होईल तेव्हा तेव्हा जिरे पाणी घ्या. पोटदुखी कमी होईल.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *