- आरोग्य

केस गळत असल्यास करा हे घरगुती उपाय

सतत तणावाखाली राहिल्यामुळे, केसांसाठी केमिकल्सचा जास्त वापर केल्याने, जेवणामध्ये फास्ट फूड खाणं वाढल्यास, केसगळती होऊ शकते, क्षारयुक्त पाण्याने आंघोळ केल्याने केस गळती सुरु होते. जर आपले हि केस जास्त प्रमाणात गळत असतील तर आपण खाली दिलेले काही घरगुती उपाय करून केसांची गळती थांबवू शकता.

मेथी दाणे केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. केस गळत असल्यास मेथीचे दाणे रात्री भिजवून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावा. पूर्ण सुकल्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. मेथी मधील आवश्यक घटक केसांच्या मुळांना मिळून केस गळती थांबते.

जास्वंदीचे फुल केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही या फुलाचा वापर केस गळती रोखण्यासाठी करू शकता. त्यासाठी जास्वंदीची फुले खोबरेल तेलात कुस्करून कोमट करा. आणि यापासून तयार झालेले तेल केसांना लावा. तुमचे केस गळणार नाहीत. तसेच केसांना वेगळी चमक येईल. आणि आपली केस गळती थांबण्यास मदत होईल.

केस गळणे थांबवण्यासाठी लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या ठेचून त्यामध्ये थोडेसे नारळ तेल मिसळून हे मिश्रण आपल्या केसांवर लावा. असे केल्याने आपली केस गळती थांबण्यास मदत मिळेल.

आवळा म्हणजे केसांच्या समस्येवर रामबाण उपाय म्हणावा लागेल. जर केस गळती थांबवायची असेल तर यासाठी आवळ्याचा रस लिंबू रसात मिसळा आणि हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा. केस गळती आपोआप कमी होईल.

केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही कोरफड लावू शकता. तसेच कांद्याचा रस लावल्याने ही केस गळणे कमी होते. असे आयुर्वेदिक घरगुती उपाय जर तुम्ही केले तर तुमचे केस खराब न होता केस गळती थांबण्यास मदत होईल. केस गळू नये यासाठी जास्त गरम पाण्याने केस धुवू नका.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *