- आरोग्य

कावीळ झाली आहे हे कसे ओळखाल?

साधारणपणे दूषित अन्न किंवा दूषित पाण्याचे सेवन केल्याने कावीळ होण्याची शक्यता असते. कावीळ हा आजार झाल्यावर आपल्या रक्तातील लाल पेशींचे रुपांतर बिलीरुबीनमध्ये होते. त्यामुळे लघवी गडद पिवळी होऊ लागते.

या बरोबरच कावीळ झाली असेल तर सौम्य ताप येतो. आणि आपल्याला सतत थकवा येतो. काही काम करायची इच्छा होत नाही काही खावेसे वाटत नाही. हाता पायाची नख पिवळट दिसू लागतात. डोळ्यांची बुब्बळे पिवळी पडतात.

आपली त्वचा देखील पिवळी दिसू लागते. अशी लक्षणे जाणवू लागल्यास आपल्याला झालेला आजार कावीळच आहे याची खात्री करुन घेण्यासाठी आपण डॉक्टरांच्या मदतीने रक्ताची तपासणी करून घ्या. जर आपल्याला कावीळ हा आजार झाला असेल तर कावीळीवरील लस घ्या.

कावीळ आजार झाल्यानंतर आपली काही खायची इच्छा राहत नाही, यासाठी आपण पुढील काही घरगुती उपाय करू शकता. कावीळ झाल्यानंतर दिवसभरात 3 ते 4  वेळा 10 ते 12 भिजवलेले मनुके खा. भिजवलेले मनुके खाल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळेल.

कावीळ झाल्यानंतर दिवसभरात 3 ते 4 ग्लास उसाचा रस प्या. उसाचा रस प्यायल्याने आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते तसेच रक्त तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते. शिवाय आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते.

कावीळ झाल्यानंतर सकाळी रिकाम्या पोटी अर्धा कप पपईच्या कोवळ्या पानांचा रस घ्या. पपईच्या पानांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची क्षमता असते. कावीळ झाल्यानंतर दिवसभरात 15 ते 20 तुळशीची पाने खा. तुळशीची पाने खाल्याने आपल्या तोंडाला चव येईल आणि आपली रोग प्रतिकार शक्ती हि सुधारण्यास मदत मिळेल.

सकाळी रिकाम्या पोटी एक कप भर टोमॅटोचा रस प्यायल्याने हि आपल्या तोंडाला चव येईल आणि आपल्याला तरतरी यायला मदत मिळेल. कावीळ झाल्यानंतर कपभर आवळ्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून प्या. असे केल्याने आपल्याला लवकर आराम मिळेल.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *