- आरोग्य

बंद नाक उघडण्यासाठी प्रभावी घरगुती उपचार

वातावरणातील बदलांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अचानक थंड पदार्थांचे सेवन केल्याने, रोग प्रतिकारशक्ती कमजोर असल्यास, वातावरणातील धुळीची एलर्जी असल्यास सर्दी होऊन नाक बंद होते.

नाक बंद असल्यास आपली  संपूर्ण दिनचर्या खराब होते. यामुळे आपली झोप देखील पूर्ण होऊ शकत नाही. कधीकधी बंद नाक आपल्यासाठी मोठी समस्या बनत. या काही घरगुती उपायांद्वारे सहजपणे बंद नाक उघडू शकता – चला तर जाणुन घेउयात बंद नाक उघडण्यासाठी घरगुती उपचार

सर्दीमुळे नाक बंद झाल्यावर एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि मग भांड्याच्या वरच्या बाजूस टॉवेलच्या मदतीने आपले तोंड झाकून घ्या. थोडावेळ वाफ घ्या. असे केल्याने बंद नाक अल्पावधीतच उघडेल. आणि आपल्याला आराम मिळेल. सर्दीच्या तीव्रतेनुसार आपण दोन ते तीन वेळा वाफ घेऊ शकता.

सर्दीचा त्रास कमी होण्यासाठी आपण दोन तीन लसणाच्या पाकळ्या खाऊ शकता. लसणामध्ये अँटीवायरल गुणधर्म असतात. ज्यामुळे ते व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यासाठी मदत मिळते. सर्दीचा त्रास कमी होण्यासाठी आपण कोमट पाण्यात 2-3 चमचे मध मिसळून पिऊ शकता. या शिवाय गरम दुधामध्ये दोन चमचे मध मिसळून हि पिऊ शकता.

सर्दीचा त्रास कमी होण्यासाठी 1 ग्लास दुधामध्ये तुळशीची काही पाने मिसळून चांगले उकळून घ्या. नंतर थोडा वेळ जरासे गार होऊ द्या. कोमट असतानाच आपल्याला ते प्यायचे आहे. सर्दीचा त्रास कमी होण्यासाठी आल्याचा चहा हि आपण पिऊ शकता, आल्यामध्ये अँटीवायरल गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी कमी व्हायला मदत मिळते.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *