- आरोग्य

सकाळी कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून पिल्यास मिळणारे आरोग्यदायी फायदे

हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे हळद आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. जर कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून सेवन केले तर याचे फायदे अधिक वाढतात. हळदीमधील आरोग्यासाठी फायदेशीर तत्वे शरीराला मिळतात चला जाणून घेऊयात  कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून पिल्यास मिळणारे आरोग्यदायी फायदे

तोंडाला आतून फोड आले असल्यास (तोंड आले असल्यास) एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून दिवसातून तीन वेळा त्या पाण्याने गुळणा करा. फोड लवकर बरे होण्यास मदत मिळेल.

दररोज रात्री एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून प्यायली तर सांधे दुखीत आराम मिळतो. आपली हाडे मजबूत होतात, सांध्यातील वेदना कमी होतात. कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून पिल्यास शरीरातील रक्तभिसरणाची प्रक्रिया सुधारते. आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते.

रक्तातील अशुद्धी दूर करण्यासाठी एक चमचा आवळा पावडर आणि अर्धा  चमचा हळद एक कप पाण्यात मिसळून प्यायल्यास रक्तातील अशुद्धी दूर होण्यास मदत मिळेल.

नियमित कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून पिल्यास पचनासंबंधी ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होतात. कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून पिल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते.

त्वचेचा रंग उजळतो. हळदीमध्ये रक्त स्वच्छ करणारे घटक असतात. हळदीमुळे त्वचेमधील विषारी घटक बाहेर निघण्यास मदत होते. यामुळे त्वचा साफ, स्वच्छ आणि उजळ होते. त्याच बरोबर आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.

शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यात 1 चमचा हळद आणि 2 चमचे मध मिसळून दिवसातून दोनदा प्यायल्याने रक्त वाढण्यास मदत मिळेल.

नियमित कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून पिल्यास त्वचेचा रंग उजळतो. हळदीमध्ये रक्त स्वच्छ करणारे घटक असतात. हळदीमुळे त्वचेमधील विषारी घटक बाहेर निघण्यास मदत होते. आणि त्वचा साफ, स्वच्छ आणि उजळ होते.

घसा बसला असता अथवा घशामध्ये खवखव होत असेल तर मीठ आणि हळद कोमट पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने गुळण्या केल्याने तुमचा घसा खवखवणे बंद होईल, आणि घसा बसला असल्यास आवाज सुधारेल. हा उपाय आपण महिन्यातील आठ दिवस करू शकता. या उपायाने आपल्या शरीरातील वि’षा’री घटक बाहेर निघण्यास मदत होईल.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *