- आरोग्य

ड्रॅगन फ्रूट “कमलम फळ” खाण्याचे आरोग्यदायी फायदे

प्रत्येक फळाचे स्वतःचे खास गुणधर्म असतात, जे आपल्या शरीराला पोषकद्रव्ये देण्याचे काम करतात. ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम, फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक एसिड, फायबर, अँटिऑक्सिडंट असे पोषक घटक असतात. खरतर कोणत्याही फळाचे नाव ड्रॅगन असे नसले पाहिजे म्हणूनच भारतात या फळाचे नाव ‘कमलम’ करण्यात आले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कमलम फळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

कमलम फळाच्या सेवनाने आपल्या शरीरातील रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत मिळते. कमलम खाल्याने मधुमेहापासून बचाव व्हायला मदत मिळते.

शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आपण ड्रॅगन फ्रूट म्हणजेच कमलम फळाचे सेवन करू शकता. पोट आणि आतड्यांशी संबंधित विकार दूर ठेवण्यासाठी आपण कमलम फळाचे सेवन करू शकता.

ड्रॅगन फ्रूट म्हणजेच कमलम फळाचे सेवन केल्याने त्यामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे सांधेदुखीचा त्रास कमी व्हायला मदत मिळते. ड्रॅगन फ्रूटमध्ये (कमलम फळामध्ये) मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन-सी असते. या फळाचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत व्हायला मदत मिळते. कमलम फळामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. या फळाचे सेवन केल्याने हाडे आणि दात मजबूत व्हायला मदत मिळते.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *