डोके दुखीचा त्रास झाला नाही असा माणूस शोधूनही सापडणे अवघड. डोके दुखायला लागले की काही सुचेनासे होते. बऱ्याचदा मानसिक तणावामुळे, खूप थकल्यामुळे, भूक लागल्याने डोकेदुखी होत असते.
डोकेदुखी एक सामान्य आजार आहे. जो कोणालाही आणि कधीही होण्यास सुरुवात होते. याचा वेळीच इलाज न केल्यास त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात. म्हणूनच आज आपण जाणून घेऊयात डोके दुखीवर साधे सोपे घरगुती उपाय
डोके दुखत असल्यास थोड्याश्या आल्याचा तुकडा घ्या तो ठेचून त्यामध्ये चमचाभर लिंबू रस मिसळून खाल्यास डोकेदुखी कमी होण्यास मदत मिळते. जर अत्याधिक भूक लागल्याने डोके दुखत असेल तर काहीतरी खाल्याने हि डोकेदुखी कमी होते.
दालचिनीचा वापर डोके दुखीच्या समस्येस चांगला दिलासा देतो. दालचिनी बारीक करून त्यात थोडे पाणी घालून अर्धा तास डोक्यावर ठेवा. सर्दीमुळे होणाऱ्या डोकेदुखीत धणेपूड आणि साखरेचा घोळ तयार करून त्याचे सेवन केल्याने फरक पडतो.
डोके दुखत असल्यास एक चमचा सुंठेची पूड घ्या. त्यात पाणी टाकून त्याची पेस्ट बनवा आणि गरम करुन घ्या. यानंतर हे मिश्रण कपाळावर लावा. थोड्याच वेळात डोकेदुखी थांबेल.
डोकेदुखी घालवण्यासाठी तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग कपड्यात बांधून घ्या. त्यानंतर या कपड्यातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होईल.
लसणाची एका कळीचा रस बनवून प्यायल्याने देखील डोकेदुखीवर आराम मिळतो. अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळे ही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरते.
आलेयुक्त चहा हा स्वादालाही चांगला लागतो आणि डोकेदुखीत आराम देतो. आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊन वेदना कमी होते. आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने सुद्धा बऱ्याचदा डोके दुखी सुरु होत असते. त्यामुळे नियमितपणे पुरेसे पाणी प्यायची सवय लावा.
आपल्याला डोके दुखीवर साधे सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.