घरामध्ये लागणाऱ्या पाण्यासाठी आपल्या घराच्या छतावर पाण्याची टाकी असते. काही दिवसानंतर पाण्यामधून येणाऱ्या मातीमुळे तसेच क्षारांमुळे आणि शेवाळामुळे टाकीतील पाण्याची चव खराब लागायला लागते. टाकीच्या तळाशी या गोष्टी जमा होत असतात. अशा वेळी मग टाकी साफ करण्याचा विचार आपल्या डोक्यात येतो. तेव्हा या घरगुती उपायांची आपल्याला मदत नक्कीच होऊ शकते.
सर्वप्रथम पाण्याच्या टाकीचे सप्लाय बंद करा. टाकीमध्ये असणारे पाणी खाली करा. टाकीमध्ये जास्त पाणी असल्यास आपल्याला टाकी पाहिजे तशी साफ करता येणार नाही. म्हणूनच जास्तीचे पाणी टाकीमधून काढून टाका. त्यानंतर एका कपड्यावर 100 मिली व्हाईट व्हिनेगर घ्या.
त्यानंतर हातामध्ये रबरी मोजे घालून तो कपडा एखाद्या काठी किंवा लांब अश्या प्लास्टिकच्या नळीला बांधून त्याने आपली पाण्याची टाकी आतून पुसून घ्या. अर्धा तास राहूद्या. व्हाईट व्हिनेगरमुळे टाकीच्या आतमध्ये पडलेले क्षारांचे डाग निघण्यास मदत होईल.
त्यानंतर एका बादलीमध्ये 20 लिटर पाणी घ्या त्या मध्ये दोन चमचे ब्लिचिंग पावडर मिसळा. ते पाणी टाकीमध्ये टाका. कपड्याच्या किंवा ब्रशच्या सहाय्याने संपूर्ण टाकीला आतल्या बाजूने हे मिश्रण लावा. अर्धा तास राहूद्या.
असे केल्याने ताकीमधील सगळी घाण निघून जाईल. नंतर टाकी पाणी टाकून चांगली व्यवस्थित दोन वेळा धुऊन घ्या. उन्हामध्ये कोरडी होऊद्या. टाकीचा वास येतोय का हे बघून मग टाकीमध्ये पाणी भरा. आपली पाण्याची टाकी लहान असेल तर आपण ती साफ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा हि वापर करू शकता.
आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.