- आरोग्य

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

उन्हामुळे चेहरा काळा पडतो. घरच्या घरी तुम्हाला जर चेहऱ्यावरचे डाग घालवायचे असतील तर या काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. चला तर जाणुन घेऊयात चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय. चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी कच्च्या बटाट्याचा रस त्या डागावर लावल्याने डाग कमी होतात आणि चेहऱ्याचे सौंदर्य खुलते.

मध हा तुमच्या चेहऱ्याला सुंदर बनवण्यासाठी घरातील एक उत्तम रामबाण उपाय आहे. मधामध्ये अँटिबॅक्टेरियल तत्व जास्त प्रमाणात आढळतात. चेहऱ्यावरील डाग असणाऱ्या ठिकाणी मधाचे काही थेंब लावा. असे केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत मिळेल.

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे चंदन. चंदन हे गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा लेप काही काळ चेहऱ्यावर लावून ठेवा आणि काही वेळानंतर तो धुवा. त्यामुळे लवकर फरक जाणवेल आणि तुमचा चेहरा उजळून निघेल.

हळद ही पूर्वपरंपरेने त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरली जाते. चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी थोडीशी हळद घेऊन तिच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाका आणि कच्चे दूध मिसळून त्यांची पेस्ट तयार करा.

हा थर चेहऱ्यावर वाळेपर्यंत ठेवावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. असे केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत मिळेल. दररोज अंजीर खाल्ल्याने चेहऱ्यावर डाग येणे कमी होते. चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत मिळते.

डोळ्यांखाली येणाऱ्या डागांना कमी करण्यासाठी तुम्ही काकडीचे काप आपल्या डोळ्यांवर लावा असं केल्याने काकडीच्या थंडाव्याने डोळ्यांखालील जमलेली काळी वर्तुळं घालवण्यासाठी मदत मिळेल.

पपईमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. जे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असतात. पपईने मसाज केल्याने तुमच्या चेहऱ्याला मुलायमपणा प्राप्त होतो आणि तुमचा चेहरा तजेलदार दिसतो. त्यामुळे पपई चेहऱ्याला लावणे नक्कीच फायद्याचे आहे

चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी दोन चमचे मधामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावरच्या गडद काळ्या डागांवर लावा. काही मिनिटे हा थर चेहऱ्यावर ठेवावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवावा. चेहरा तजेलदार होतो.

चेहऱ्यावर पुरळ आले असतील तर हे पुरळ हाताने अथवा नखाने फोडू नका. तसे फोडले असता तुमचा चेहऱ्यावर सर्वत्र पुरळ मोठ्याप्रमाणत वाढतील आणि काळे डागही मोठ्या प्रमाणात येतील.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *