नायट्याने सुटणारी खाज फार वेदनादायी असते. अस्वच्छता, दमटपणा, एकमेकांचे कपडे अथवा टॉवेल वापरणे यामुळे हा रोग होतो. गोलाकार असणारा हा नायटा एकप्रकारे बुरशीच असते. त्वचेशी संबंधित असलेल्या या आजाराकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. नायटा घालविण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय आज आपण पाहणार आहोत.
सर्वात महत्वाची गोष्ट अशी की नायटा हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे सहसा एकमेकांचे टॉवेल्स, कपडे वापरणे टाळावे. नायटा झालेला भाग जर स्वच्छ धुतला तर काही दिवसात हा रोग बरा होतो. त्यामुळे शरीराची स्वच्छता ठेवा. नायटा कमी करण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे कडूलिंबाचे तेल. कडूलिंबाचे तेल नायटा झालेल्या जागेवर हलक्या हाताने लावल्यास नायटा कमी होतो.
ज्या ठिकाणी नायटा उठला आहे ती जागा कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही वापरत असलेली कपडे कडक उन्हामध्ये सुकवा आणि त्याचा वापर करा. उन्हामुळे कपड्यांवरील ओलावा नष्ट होतो व जंतू मरण पावतात. नायटयाच्या जागेवर खाज सुटल्यानंतर पुदीनाची पाने बारीक करून त्या जागेवर लावा काही वेळाने ती जागा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.
खाज येत असल्यास तुळशीची पाने चांगली धुवून पाण्यात उकळा आणि नंतर आंघोळीच्या पाण्यात मिसळा. अन त्या पाण्याने आंघोळ करा. शरीराच्या ज्या ठिकाणी नायटा आलेला आहे ती जागा प्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.त्यानंतर झेंडूची काही पाने घ्या.
ती पाने थोड्याश्या पाण्यात उकळा. उकळल्या नंतर पाणी थंड होऊद्या. त्यातील पाने वाटून घ्या अन ज्या पाण्यात ती पाने उकळली होती ते पाणी अन वाटून घेतलेल मिश्रण शरीरावर जिथे खाज सुटते. अशा ठिकाणी ते लावा. अर्ध्या तासाने तो भाग स्वच्छ कपड्याने पुसून घ्या या उपायाने नायटा कमी होण्यास मदत मिळेल.
मेडीकल मध्ये करंज तेल भेटत ते लावल्याने नायटा बरा होतो. करंज तेल ज्या ठिकाणी नायटा उठला आहे त्या ठिकाणी लावा. नायटा निघून जाईल. करंज तेल नायटावर एक उत्तम उपाय आहे.
नायटा झालेल्या ठिकाणी नखे लावणे टाळा. नखांमधील जंतू नायटा वाढण्यास कारणीभूत ठरतात. नखे लावल्याने हा नायटा पसरू शकतो. त्यामुळे जास्त खाज सुटू शकते.
आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.