- आरोग्य

कोणतेही करपलेले भांडे साफ करण्यासाठी घरगुती उपाय

बऱ्याचदा घरामध्ये स्वयंपाक बनवत असताना मध्येच दुसरे काही काम कराव लागत त्यामुळे गॅसवर ठेवलेले दुधाचे भांडे, चहाचे भांडयातील चहा आटून जातो आणि भांडे करपते. भांडे करपले कि मनस्ताप तर होतोच पण ते भांडे परत पहिल्यासारखे कसे होईल हा प्रश्न आपल्या मनात येतो. म्हणूनच इन्फोमराठीच्या या लेखात आज आपण जाणून घेणार आहोत. करपलेले भांडे साफ करण्यासाठी घरगुती उपाय

सर्वप्रथम आपण त्या करपलेल्या भांड्यामध्ये जितका भाग करपला आहे तो बुडेल इतके पाणी भरा. त्यानंतर ते भांडे गॅसवर ठेवा. मग त्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिसळा. आपल्याकडे बेकिंग सोडा उपलब्ध नसेल तर आपण इनोचा वापर करू शकता.

मग त्यामध्ये थोडेसे भांडी घासायचे लिक्विड टाका. त्यानंतर मंद आचेवर 10 मिनिटे उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. आणि थंड होऊद्या. त्यानंतर ते पाणी काढून टाका. थोडेसे कोमट पाणी आणि भांडी घासायचे लिक्विड टाकून हलक्या हाताने चोळले तरी आता करपलेले भाग निघेल. जर आपल्याकडून चुकून कधी भांडे करपले तर हि सोपी ट्रिक आपण वापरू शकता.

आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *