- आरोग्य

अश्वगंधाचे चमत्कारिक फायदे

अश्वगंधा हे आयुर्वेदानुसार एक अतिशय प्रभावी औषध आहे. अश्वगंधाचा वापर हजारो वर्षांपासून अनेक गंभीर आजारांसाठी केला जातो. अश्वगंधामध्ये आरोग्यासाठी अनेक लहान – मोठे गुणधर्म असतात जे आज आपण जाणून घेणार आहोत.

आज कालच्या या धावपळीच्या जीवनात, बरेचशे लोक सतत कुठल्या ना कुठल्या तणावात असतात. अश्वगंधाचे सेवन केल्याने ताण चिंता, मानसिक समस्या कमी होण्यास मदत मिळते.

जर आपल्याला रात्री व्यवस्थित झोप येत नसेल तर अर्धा चमचा अश्वगंधाची पावडर एक ग्लास दुधामध्ये मिसळून ते दुध प्यायल्याने आपल्याला चांगली झोप येईल. तसेच अस्वस्थतेपासून हि आराम मिळेल.

जर आपल्याला मधुमेहाचा त्रास असेल तर आपण अर्धा चमचा अश्वगंधाची पावडर पाण्यामध्ये मिसळून घेतल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असल्यास आपण अर्धा चमचा अश्वगंधाची पावडर पाण्यामध्ये मिसळून घेतल्याने त्यामधील आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट आणि एंटीइंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.

पुरुषांमधील लैंगिक दुर्बलता घालवण्यासाठी अश्वगंधाच्या पावडरचा उपयोग केला जातो. अश्वगंधा पावडर पुरुषांसाठी शक्ति वर्द्धक असते. आपण रात्री झोपण्याआधी दुधासोबत अश्वगंधा पावडर घेऊ शकता.

आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *