- आरोग्य

उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय

उचकी लागली तर आपणं लगेच पाणी पितो आणि उचकी थांबते. पण काहीजणांची उचकी पाणी प्यायल्यानंतरही थांबत नाही. त्यांच्यासाठीच काही घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

उचकी आल्यावर लगेच एक चमचा साखर खावी. साखर खाल्यामुळे थोड्यावेळात उचकी थांबते. त्याशिवाय साखर आणि थोडं मीठ पाण्यात टाकून ते थोड्या थोड्या वेळाने प्यायल्यास उचकी थोड्यावेळात बंद होते.

उचकी आल्यावर सुंठ पाण्यात उगाळून त्याचा वास घेतला तरी उचकी थांबते. अनेकवेळा जलदगतीने खाल्ल्याने उचकी लागते, जेवताना हळूहळू आणि चावून जेवा, असे केल्यास उचकी थांबते. जलदगतीने खाल्ल्याने किंवा तिखट खाल्याने उचकी लागते.

लिंबू किंवा एखादे आंबट लोणचेही चाखल्यास उचकी थांबते. लिंब, कैरी, टॉमेटोच्या फोडी करून खाल्ल्याने ही उचकी थांबते. उचकी आल्यावर आल्याचे लहान लहान तुकडे करून चघळावे. असे केल्याने हि उचकी थांबते.

उलटे अंक मोजल्याने तसेच अचानक त्या व्यक्तीला घाबरविल्यास त्याची उचकी जाते. उलटे अंक १०० ते १ असे मोजावेत. ज्यांना सतत उचकीचा त्रास होत असेल त्यांनी नियमित श्वसनाचे व्यायाम करावेत. दोन तीन काळीमिरी खडीसाखरे बरोबर चावून खाल्याने देखील उचकी थांबते. उचकी आल्यावर तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते.

उचकी थांबवण्यासाठी, अनेक घरगुती उपाय आहेत. मात्र काही काळ श्वास रोखून ठेवणे, हा एक उत्तम उपाय आहे. दीर्घ श्वास घ्या व तो काही काळ रोखून ठेवा. हळूहळू श्वास सोडा. उचकी थांबण्यासाठी असे २-३ वेळा करा.

आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *