- आरोग्य

व्हेरीकोज व्हेन्स घालवण्यासाठी घरगुती उपाय

खराब आहार आणि व्यायामाचा अभाव आणि गतिहीन जीवनशैलीमुळे आपल्या शरीरामधील रक्तवहन करणाऱ्या शिरामध्ये अडथळा निर्माण होऊन  त्या रक्तवाहिन्यांना सूज येते. आणि त्यामुळे व्हेरीकोज व्हेन्स ठळकपणे दिसू लागतात.

वयाच्या चाळीशी नंतर शरीरातील रक्तवाहिन्याची लवचिकता कमी होऊ लागते. हात आणि पायाने आपण जास्त हालचाल करतो, हात आणि पायामध्ये शरीरातील रक्तप्रवाह हा जास्त प्रमाणात असतो. जास्तकरून हा आजार स्त्रियांमध्ये होत असतो.

ह्या अशुद्ध रक्तवाहिन्यांचा काही त्रास नसतो. परंतु हळूहळू कालांतराने ही समस्या वाढते आणि यामुळे आरोग्याशी संबंधित इतर समस्या निर्माण होतात. जसे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येणे अशा गोष्टी होऊ शकतात म्हणून वेळीच यांचा ईलाज केलेलं चांगल असत. आज आपण व्हेरीकोज व्हेन्स घालवण्यासाठी घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.

व्हेरीकोज व्हेन्स घालवण्यासाठी आपण नियमितपणे 1 ग्लास डाळिंबाचा रस प्या. डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीरातील रक्त परिसंचरण क्रिया व्यवस्थित होण्यास मदत मिळेल.

व्हेरीकोज व्हेन्स घालवण्यासाठी रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा मध मिसळून नियमितपणे प्यायल्याने आपल्या शरीरामधील रक्तवाहिन्यामधील अडथळा दूर होण्यास मदत मिळेल. ग्रीन टी रक्त पातळ करण्याचे काम करते, वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आपण ग्रीन टी चे सेवन करू शकता.

ऑलिव्ह ऑईलने नियमितपणे मालिश केल्याने काही दिवसात बंद नसा उघडण्यास मदत मिळते. या बरोबरच रक्त वाहिन्यामधील सूज आणि वेदना मध्ये देखील आराम मिळतो. या बरोबरच व्हेरीकोज व्हेन्स होऊ नयेत या साठी या गोष्टी आवर्जून करा.

आपल्या आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश असुद्या, दिवसभरात काही वेळ शारीरिक व्यायामासाठी द्या. शक्य तितके चालणे, पोहणे, योगा करणे अशा गोष्टी आपण करू शकता.

योगासने केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालण्यास मदत मिळते. तसेच इतर हि लाभ होतात. आपल्या आहारात मिठाचे प्रमाण कमी असुद्या. एका जागी जास्त वेळ बसून काम करू नका. कामाच्या मध्ये काही मिनिटांचा ब्रेक घेऊन तिथल्या तिथे चाला. एका जागी बसून राहिल्याने पायाच्या शिरांवर ताण येत असतो.

आपल्याला व्हेरीकोज व्हेन्स घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *