- आरोग्य

पनीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना पनीर खाणे आवडते. दुधापासून बनवलेले हे पनीर अत्यंत पौष्टिक असत. पनीर खाल्याने आपल्याला भरपूर प्रोटिन्स मिळतात. 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात.

तसेच यामध्ये कॅल्शियम, झिंक, फॉस्फरसचे प्रमाणात जास्त असते. त्यामुळे पनीर खाणे फायदेशीर आहे. आज आपण पनीर खण्याचे आरोग्यदायी फायदे पाहुयात. नियमित पनीरच्या सेवनाने शरीरात रक्ताची कमतरता राहत नाही. रक्ताची कमी भरून काढण्याचे काम पनीर करते.

पनीर हा प्रोटिन्सचा मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे प्रोटिन्सची कमतरता दूर करण्यासाठी पनीर खाऊ शकता. रक्तात साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी पनीर खाणे उपयुक्त आहे. पनीरच्या सेवनाने अनेक आजार दूर होतात. वजन कमी करण्यासाठी पनीर खाणे उपयुक्त आहे. पनीर खाल्याने फॅट कमी होते. त्यामुळे वजन कमी होते.

नियमित पनीर खाल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत मिळते. हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक कॅल्शियम पनीरमध्ये असतात. त्यामुळे दात, हाडे ठिसूळ होत नाहीत. पनीरच्या सेवनाने दातांना आणि हाडांना मजबुती प्राप्त होते.

पनीर बऱ्याच  पोषक तत्वांचा भांडार असल्याने गर्भवती महिलांसाठी पनीर खूप फायदेशीर असते. पनीरमध्ये आढळणारे कॅल्शियम गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरते. पनीरचे सेवन प्रमाणातच केल्यास फायदा होतो. शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी पनीरचे सेवन उपयुक्त आहे.

आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *