- आरोग्य

बाजारातून आणलेल्या भाज्या, फळांवरील कीटकनाशकांचा अंश काढून टाकण्याचे सोपे मार्ग..

शेतामध्ये फळे व भाजीपाला कीटकांपासून बचाव करण्यासाठी त्यांच्यावर वेगवेगळी कीटकनाशक औषधांची फवारणी केली जाते. तसेच फळे व भाजीपाला यांचे उत्पन्न वाढावे म्हणून त्यांच्यावर वेगवेगळया औषधांची फवारणी केली जाते. कीटकनाशके आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.

केवळ पाण्याने धुण्यामुळे या कीटकनाशक औषधांचा प्रभाव कमी होत नाही.  जेव्हा आपण या अशा भाज्या आणि फळांचा अन्न म्हणून वापर करतो, तेव्हा आपल्या मूत्रपिंड आणि यकृत वर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

भाज्या साध्या पाण्यात धुतल्याने त्यातील फक्त 20 ते 25  टक्केच कीटकनाशकाचा अंश निघून जातो. भाज्या व्यवस्थित स्वच्छ न झाल्याने अनेक आरोग्याचा समस्या उद्भवू शकतात.

इतकेच नाही तर संशोधनांनुसार फळं आणि भाज्या न धुता खाल्ली तर त्यावरील कीटकनाशकांचा परिणाम आपल्या हार्मोन्स, प्रजनन, शुक्राणूंची गुणवत्ता आणि मेंदूच्या विकासावरही परिणाम होऊ शकतो.

म्हणूनच, शरीरास रोगमुक्त ठेवण्यासाठी फळं आणि भाज्या स्वच्छ करून खाणे गरजेच आहे. चला तर जाणुन घेउयात. बाजारातून आणलेल्या भाज्या,फळांवरील  कीटकनाशकांचा अंश काढून टाकण्याचे सोपे मार्ग.

भाज्यांना कीटकनाशक मुक्त करण्यासाठी एका पातेल्यात सर्व भाजीपाला घ्या त्यामध्ये थोडेसे पाणी घाला. नंतर त्यामध्ये  2 चमचे बेकिंग सोडा मिसळा. या पाण्यात फळे आणि भाज्या 10-15 मिनिटे ठेवा. नंतर ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर त्या आपण वापरू शकता. बेकिंग सोडयाच्या मदतीने आपण फळे आणि भाज्यावरील जवळपास 98% कीटकनाशकांचा अंश काढून टाकू शकता.

हिरव्या पालेभाज्यांना कीटकनाशक मुक्त करण्यासाठी पातेल्यात पाणी घ्या. त्या पाण्याला उकळून घ्या. उकळल्यानंतर त्यात ४ चमचे मीठ घाला त्यानंतर ते पाणी थंड होउ द्या. त्या पाण्याने भाज्या चांगल्या धूऊन घ्या.  मीठ आणि पाण्याच्या मिश्रणाने भाज्यांवरील कीटकनाशके प्रभावीपणे हटविली जाऊ शकतात.

फुलकोबी, कोबी आणि ब्रोकोली सारख्या भाज्या धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. याव्यतिरिक्त, कोबीचा वरचा पानांचा थर काढून टाका. याशिवाय फळांची आणि भाज्यांची साल काढून ते खाणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.

भाज्यांना कीटकनाशक मुक्त करण्यासाठी आपण हळदीचा वापर हि करू शकता. हळद एक लिटर गरम पाण्यात पाच चमचे हळद घालून फळे आणि भाज्या धुवू शकता.

भाज्यांना कीटकनाशक मुक्त करण्यासाठी एक लिटर पाण्यात अर्धा कप जाडे  मीठ मिसळा आणि त्यात फळे आणि भाज्या 8-10 मिनिटे ठेवा. यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यांचा वापर करा.

फळं आणि भाज्यांना कीटकनाशक मुक्त करण्यासाठी पाण्यात पांढरा व्हिनेगर मिसळा आणि या पाण्यात फळे आणि भाज्या बुडवून 10 मिनिटे ठेवा. मग स्वच्छ पाण्याने धुण्यामुळे कीटकनाशकांचा प्रभाव देखील संपतो.

फळं आणि भाज्यांना कीटकनाशक मुक्त करण्यासाठी त्यांची साल काढू शकता. केळी सारख्या फळाची साल काढून खाल्ले जाते. अशीच अजून कोणती फळ आहेत ज्यांची साल काढून आपण खाऊ शकतो हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

आपल्याला बाजारातून आणलेल्या भाज्या,फळांवरील  कीटकनाशकांचा  अंश काढून टाकण्याचे सोपे मार्ग हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *