- आरोग्य

चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय

आपल्या आजूबाजूला असलेल्या धूळ आणि प्रदूषणानामुळे आपल्या त्वचेचा रंग काळपट दिसू लागतो. त्वचेचा रंग उजळवण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रसाधने, क्रीम वापरत असतो. परंतु बऱ्याचदा आपल्याला पाहिजे तसा त्याचा परिणाम काही दिसून येत नाही.

वेगवेगळ्या केमिकलचा वापर करून बनवलेल्या या प्रसाधानामुळे आपल्या त्वचेलाही नुकसान पोहचू शकते. म्हणूनच आज आपण चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी एक पिकलेल्या पपईचा तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर राहून द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग उजळेल.

चेहऱ्यावर डाग आणि सुरकुत्या असल्यास नारळाचे पाणी दिवसातून 2 वेळा चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील  डाग आणि सुरकुत्या कमी होतील. चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी गुलाबपाणी दुधात मिसळून चेहऱ्यावर लावा. अर्धा तास चेहऱ्यावर तसेच राहून द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

नियमित कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावल्याने चेहरा गोरा, स्वच्छ आणि डाग रहित होतो. यासाठी कोरफडीचा गर कमीतकमी अर्धा तास चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या.

चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी रात्री झोपण्याआधी थोडेसे निरसे दुध कापसावर घ्या अन चेहऱ्यावर लावा. अन तसेच रात्रभर सुकू द्या. सकाळी उठल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या. असे केल्याने चेहऱ्याचा रंग उजळेल.

आपल्या आहारात तळलेले, मसालेदार, फास्ट फूड खाण्याच्या ऐवजी विटामिन आणि मिनरल्स असलेले पदार्थ आहारात घ्या. जेणेकरून शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतील आणि त्वचा निरोगी राहील. दिवसभरात 3 ते 4 लीटर पाणी प्या. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातील. आणि आपली त्वचा निरोगी राहील त्यावर डाग पडणार नाही.

चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी वरील सर्व उपाया बरोबरच तणाव मुक्त राहणे गरजेचे आहे. आणि आपण नियमित चांगली झोप घेणे हि गरजेचे आहे. तरच आपल्याला पाहिजे तसा परिणाम मिळू शकतो.

आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *