बऱ्याचदा केसांमध्ये खाज येते आणि त्यानंतर त्याठिकाणी पिंपल्स अथवा फोड येतात. तुम्हालाही ही समस्या जाणवत असेल तर हि माहिती तुमच्याचसाठी आहे. घाम आणि केसामधील कोंडयामुळे डोक्यावर पिंपल्स येत असतात.
म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत डोक्यावरील केसांमध्ये पिंपल्स येत असल्यास ते घालवण्यासाठी आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकतो. केसांमध्ये पिंपल्स येत असल्यास ते घालवण्यासाठी काही कडुलिंबाची पाने उकळून घ्या अन त्याची पेस्ट बनवून मुरुमांवर लावा. हि पेस्ट लावल्याने मुरूम सुकून जातील.
कडुलिंबाच्या पानामध्ये एंटीसेप्टिक और एंटीबायोटिक गुणधर्म असतात. ज्यामुळे आपल्या केसांमध्ये पिंपल्स नाहीसे होण्यास मदत मिळेल. केसांमधील पिंपल्स घालवण्यासाठी त्यावर कोरफडाचा गर लावल्याने पिंपल्स अगदी कमी वेळात बरे होतात.
केसांमधील पिंपल्स घालवण्यासाठी एक जायफळ किसून थोड्याश्या दुधात मिसळून पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावा. अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुऊन टाका असे केल्याने पिंपल्स नाहीसे होतील.
डोक्याच्या त्वचेवरील पिंपल्स घालवण्यासाठी पिंपल्स आलेल्या ठिकाणी थोडासा लिंबाचा रस लावा सुकल्यावर किंवा 5 – 10 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने पिंपल्स नाहीसे होतील.
केसांमधील पिंपल्स घालवण्यासाठी लसणाच्या 3/4 पाकळ्या घ्या. आणि त्यांना ठेचून बारीक करा. थोड्याश्या पाण्यात मिसळा आणि हि पेस्ट मुरुमांवर लावा. दहा मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. असे केल्याने मुरूम नाहीसे होण्यास मदत मिळते.
केसांमधील पिंपल्स घालवण्यासाठी दुधात थोडी हळद मिसळा आणि पिंपल्सवर लावा आणि नंतर १० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने पिंपल्स अगदी कमी कालावधीत जातील. नियमित केस पाण्याने धुतल्याने केसांमध्ये घाण आणि धूळ निघून राहणार नाही आणि आपल्या केसांमध्ये पिंपल्स येणार नाही.
आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.