- आरोग्य

घश्यात खवखव होत असल्यास करा हे घरगुती उपाय

बऱ्याचदा हवामानातील बदलामुळे, काही तेलकट पदार्थ खाल्याने तसेच थंड पदार्थ खाल्याने घश्यात खवखव सुरु होते. घश्यात खव खव होत असल्यास घास गिळायला हि त्रास होत असतो. म्हणूनच आज आपण घश्यात खवखव होत असल्यास आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो याची माहिती आज घेणार आहोत.

हळदीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, घश्यात खवखव होत असल्यास ती थांबवण्यासाठी आपण 1 चमचा हळद 1 ग्लास पाण्यात गरम करून घ्या. पाणी कोमट झाल्यावर ते पाणी प्या असे केल्याने घश्याचा त्रास जलद बरा होतो.

लवंगामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात आणि म्हणून कोमट पाण्यात लवंग पावडर मिसळून प्यायल्याने घसा लवकर बरा होतो. घश्याची खवखव कमी करण्यासाठी एक चमचा मध कोमट पाण्यात मिसळून प्यायल्यास हि घसा लवकर मोकळा होईल.

घश्याची खवखव कमी करण्यासाठी आपण सुंठ पावडर देखील वापरू शकता. सुंठेमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे घशातील संक्रमण कमी होते.

मीठामध्ये अँटी-बॅक्टेरियल  गुणधर्म असतात. घसा खवखव करत असल्यास 1 ग्लास पाण्यात 1 चमचा मीठ टाकून गरम करून घ्या. पाणी कोमट झाल्यावर त्या पाण्याने दिवसातून 3 ते 4 वेळा गुळण्या करा. असे केल्याने घसा लवकर मोकळा होईल.

घश्याची खवखव कमी करण्यासाठी मुठभर मेथीचे दाणे 2 ग्लास पाण्यात टाकून ते पाणी गरम करून घ्या. चांगली उकळी आल्यानंतर खाली उतरवून घ्या. गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या. पाणी कोमट झाल्यावर त्या पाण्याने दिवसातून 3 ते 4 वेळा गुळण्या करा.  मेथीच्या दाण्यांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक असतात. ज्यामुळे घश्याची खवखव कमी होण्यास मदत मिळते.

आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *