- आरोग्य

भाताच्या पेजेचे आरोग्यवर्धक फायदे

भात हे आपल्या आहारातील प्रमुख घटक आहे. दिवसातून किमान एकदा तरी आपल्या जेवणात भाताचा समावेश होतो. प्रामुख्याने आजारी व्यक्तीला ऊर्जा मिळावी, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून भाताची पेज खाण्यास दिली जाते. यातील कार्बोहायड्रेट शरीराला ऊर्जा देतात.

चला तर जाणून घेऊयात तांदळाच्या पेजेचे आरोग्यवर्धक फायदे. भाताच्या पेजेमुळे पचनक्रिया सुधारते. तसेच यात फायबरचे प्रमाण अधिक असल्याने बद्धकोष्टतेच्या त्रासापासून सुटका होते. भाताच्या पेजेमुळे पोटाच्या अनेक तक्रारी कमी होतात.

जुलाब सारख्या आजारात शरीरात पाण्याची कमतरता होते. अशावेळी भाताची पेज देणे जास्त फायद्याचे आहे. शरीरात पाण्याची पातळी नियंत्रणात ठेऊन ऊर्जा देण्याचे काम भाताची पेज करते. यातून शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात.

भाताची पेज आणि गूळ एकत्रित करून प्यायल्यास रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत मिळेल. त्वचेची चमक वाढवण्यासाठी तांदळाचे पाणी कापसाच्या मदतीने चेहऱ्यास लावा. याने चेहरा सुंदर होण्यास मदत होते. तसेच या पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात.

वातावरणात बदल झाल्यामुळे सर्दी ताप हे आजार डोके वर काढतात. भाताच्या पेजने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे अशक्तपणा कमी होण्यास मदत मिळते.

सकाळी सकाळी भाताच्या पेजेत काळे मीठ टाकून प्यायल्यास भूक वाढण्यास मदत मिळते. भाताची पेज बनवण्यासाठी हातसडीच्या तांदळाचा वापर केल्यास पेज चवदार बनते. आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *