- आरोग्य

पायांना चिखल्या झाल्यास करा हे सोपे घरगुती उपाय

पावसाळ्यात विविध आजारांचा सुळसुळाट होतो. यादिवसात सर्दी खोकल्यापासून अनेक आजार डोके वर काढतात. आपण वेळच्यावेळी यावर उपचारही करतो. पावसाळ्यात आपण पूर्ण काळजी घेतो तरीही पावसाळ्यात दूषित पाणी, चिखलाच्या संपर्कात आल्यामुळे पायाला बोटांच्या मध्ये इन्फेक्शन होते. सुरवातीला खाज सुटते नंतर त्याचे रूपांतर जखमेत होण्यास सुरवात होते.

ही लहान गोष्ट असली तरी दुर्लक्ष झाल्यास थोड्याच दिवसात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल यासाठी आज पाहुयात पावसाळ्यात पायांची काळजी कशी घ्यावी. पाय वारंवार दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे चिखल्या होतात.

संसर्ग झाल्यावरही लवकर लक्षात येत नाही. पायाच्या बोटांमध्ये चिखल्या होण्याचे प्राथमिक लक्षण म्हणजे बोटांच्या मधला भाग पांढरा पडतो. असे दिसल्यास त्वचा स्वच्छ करून अँटी फंगल पावडर लावावी.

बाहेरून आल्यावर नियमितपणे पाय स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर रूमालाच्या साहाय्याने बोटांच्या मधला भाग व्यवस्थित पुसून कोरडा करून घ्यावा. बोटांमध्ये ओलावा नसल्याने चिखल्या होणार नाहीत.

बाहेरून आल्यावर पाय कितीही स्वच्छ केले तरीही नखे व बोटांच्या मध्ये बॅक्टेरिया रहातात. यासाठी झोपण्याच्या आधी कोमट पाण्यात पाय टाकून ठेवा. दहा पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने नखे व लपलेले बॅक्टेरिया सर्व स्वच्छ होईल.

चिखल्या होऊन त्रास होत असेल तर एरंडेल तेल व करंज तेलाचे मिश्रण एक चांगला उपाय आहे. तीन चमचे एरंडेल तेल घ्या त्यामध्ये एक चमचा करंज तेल मिसळून घ्या. या दोन तेलाचे मिश्रण बोटांच्यामधे लावल्यास चिखल्या निघून जातील.

पावसाळ्यात बऱ्याच जणांना बूट वापरायची सवय असते. बुटमध्ये पाणी साचून रहाते त्यामुळे पायांना संसर्ग लवकर होतो. यासाठी सॅंडल किंवा बूट वापरताना त्यात पाणी साठून रहाणार नाही अशाच सॅंडल किंवा बूट वापरा.

आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *